"प्राजक्ता नाम सुनकर flower समझे क्या..? Fire है अपुन.." प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 17:11 IST2022-10-08T17:01:11+5:302022-10-08T17:11:33+5:30

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीतले तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यावर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात.

Actress Prajakta Mali's share new photo on Instagram fans comments viral | "प्राजक्ता नाम सुनकर flower समझे क्या..? Fire है अपुन.." प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

"प्राजक्ता नाम सुनकर flower समझे क्या..? Fire है अपुन.." प्राजक्ता माळीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत येत असते. अलीकडेच प्राजक्ता लंडनवारी करुन परतली आहे. प्राजक्ता तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनाला गेली होती. आता तिने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतीच प्राजक्ताची सोशल मीडियावर एक पोस्ट चर्चेत आली आहे.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीतले तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यह लाल इश्क़, यह मलाल इश्क़
यह ऐब इश्क़, यह बैर इश्क़….।उर्वरीत लाल रंग असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.  उफ्फ्.. हाय्... ये लाल रंग कब हमें छो..डेगा, प्राजु तुझ्या सौंदर्याची व्याख्या करता येत नाही फक्त माझ्या हृदयात ठेवली आहे महाराष्ट्राची राणी आणि माझ्या हृदयाची राणी, प्राजक्ता नाम सुनकर flower समझे क्या..? Fire है अपुन fire, सौंदर्याचे कौतुक झालेच पाहिजे. 

वर्कफ्रंट...
प्राजक्तासोबत या सिनेमात अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, वैभव तत्ववादी सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता ऋषिकेश जोशी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. 

Web Title: Actress Prajakta Mali's share new photo on Instagram fans comments viral