'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 17:10 IST2024-05-20T17:09:17+5:302024-05-20T17:10:47+5:30
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर मत दिल्यानंतर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहेत (prajakta mali)

'ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना...'; प्राजक्ता माळीची सूचक पोस्ट चांगलीच व्हायरल
प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. प्राजक्ता सोशल मीडियावर विविध विषयांवर तिचं मत व्यक्त करत असते. अशातच आज मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानिमित्त प्राजक्ताने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहून नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय.
प्राजक्ता माळी लिहिते, "आधी मतदान मग बाकीचे काम. मी माझं कर्तव्य बजावलं, तुम्ही? (मुंबईकर, आज हा प्रश्न प्रत्येकाला विचारा; ज्याचं उत्तर नाही येईल त्याला guilt येऊन तो त्वरित मतदानास जाईल अशी ‘सभ्य’ वागणूक द्या.) आपलं पुढील ५ वर्षांसाठीचं भविष्य निश्चित करा. मतदान करा. यंत्रणा आपल्या प्रतिक्षेत आहे. (आत्तापर्यंत पुण्यात मतदान करत आले; मुंबानगरीतील हे पहिलं मतदान.)"
प्राजक्ताने अशाप्रकारे मतदानाचं महत्व सर्वांना सांगितलंय. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. तिने आतापर्यंत 'हंपी', 'खो खो', 'पांडू', 'तीन अडकून सीताराम' अशा सिनेमांमध्ये काम केलंय. प्राजक्ता गेली अनेक वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करतेय. प्राजक्ता तिचा व्यवसाय प्राजक्तराज सुद्धा चालवताना दिसतेय. प्राजक्ता सध्या भिशी मित्र मंडळ या सिनेमाचं शूटींग करत आहे.