मन अगदी सुन्न झालंय... परत या आजोबा...; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 10:24 AM2022-03-15T10:24:30+5:302022-03-15T10:26:28+5:30

Prajakta Gaikwad : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच तिच्या आजोबांचं निधन झालं.

actress Prajakta Gaikwad grandfather passed away share emotional post | मन अगदी सुन्न झालंय... परत या आजोबा...; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट

मन अगदी सुन्न झालंय... परत या आजोबा...; प्राजक्ता गायकवाडची भावूक पोस्ट

googlenewsNext

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील राणी  येसूबाईंच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच तिच्या आजोबांचं निधन झालं. प्राजक्ताने स्वत: एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. आजोबांच्या निधनानंतर प्राजक्ताने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

आजोबा..., अशी सुरूवात करत प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिते, ‘आता कोण बैलगाडी जुंपणार ? आता कोण माझे लाड करणार ? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार ? अभंग म्हणणार ? शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव.. सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाºया प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं...तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा...माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे... शेवटपर्यंत स्वाभिमानानं , ताठ मानेनं जगलात...सगळं आयुष्य कष्टानं जगलात. वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा... कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील...

देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री सिरीयल बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा..मन अगदी सुन्न झालंय...परत या आजोबा...’

प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईची भूमिका साकारली होती. त्यासोबतच तिने नांदा सौख्यभरे, संत तुकाराम या मालिकेत काम केलेय. सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत होती. पण काही वादांमुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले.   प्राजक्ता ही लवकरच ‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: actress Prajakta Gaikwad grandfather passed away share emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.