धक्कादायक ! टिव्ही अभिनेत्रीने मुलीची हत्या करुन केली आत्महत्या, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:19 IST2019-08-12T11:19:25+5:302019-08-12T11:19:48+5:30

ठाण्यामध्ये एक महिलेने आपल्या मुलीची हत्या करुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Actress pradnya parkar murder her daughter and then committed suicide | धक्कादायक ! टिव्ही अभिनेत्रीने मुलीची हत्या करुन केली आत्महत्या, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

धक्कादायक ! टिव्ही अभिनेत्रीने मुलीची हत्या करुन केली आत्महत्या, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

ठाण्यामध्ये एक महिलेने आपल्या मुलीची हत्या करुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळवा पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.  प्रज्ञा पारकर असे महिलेचे नाव असून पोलिसांनी घटनास्थळावरुन सुसाईड नोट जप्त केली आहे. या चिठ्ठीत मुलीची हत्या करुन मग मी आत्महत्या करत आहेत यासाठी कोणाला ही जबाबदार ठरवू नये. 


प्रज्ञा पारकर पती प्रशांत पारकर आणि 18 वर्षांची मुलगी श्रृतीसोबत मनीषा नगर इथल्या गौरी सुमन सोसायटीत राहत होत्या. प्रज्ञा यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आहेत. श्रृती बारावीची विद्यार्थींनी होती. प्रज्ञा यांचे पती गेल्या शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता जीमला गेले होते ते 9.30 वाजता ते परत आले, मात्र खूप वेळा कुणी दरवाजा उघडला नाही. शेवटी चावी वाल्याला बोलवून दरवाजा उडण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर आता त्यांना मुलीचा आणि पत्नीचा मृतदेह दिसला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार प्रज्ञाने आधी मुलीला गळा दाबून मारलं आणि मग स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रज्ञाला अनेक दिवसांपासून काम मिळतं नव्हते. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. प्रशांत यांची नोकरी सुटली होती त्यामुळे कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण होते.    

  
प्रज्ञा पारकर यांनी टिव्ही आणि नाटक यांच्यासोबत मॉडेलिंगदेखील केले आहे. प्रज्ञा सोशल मीडियावर सक्रिय असायच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी अक्षय खन्नाचा आगामी सिनेमा 'सेक्शन 375'चं ऑफिशियल टीजर शेअर केले होते. या सिनेमात त्यांनी काम केले असल्याची माहिती त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिली होती. 19 जूनला प्रज्ञाची मुलगी  श्रृतीचा वाढदिवस होता. 

Web Title: Actress pradnya parkar murder her daughter and then committed suicide