चेहऱ्यावर चष्मा, वाढलेली दाढी अन् रस्त्यावर भीक मागताना दिसला 'हा' कलाकार, नेटकरी थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:59 IST2025-09-04T11:58:24+5:302025-09-04T11:59:01+5:30
एका प्रसिद्ध कलाकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा कलाकार रस्त्याच्या कडेला भीक मागताना दिसल्याने नेटकरी थक्क झाले आहेत

चेहऱ्यावर चष्मा, वाढलेली दाढी अन् रस्त्यावर भीक मागताना दिसला 'हा' कलाकार, नेटकरी थक्क
मनोरंजन विश्वातून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक प्रसिद्ध कलाकार रस्त्याच्या कडेला गाणं गात भीक मागताना दिसतोय. या कलाकाराची अशी अवस्था बघून नेटकरी चांगलेच थक्क झाले आहेत. त्यानंतर हा कलाकार कोणी अभिनेता नसून एक अभिनेत्री आहे कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कलाकाराची अशी अवस्था बघून नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. कोण आहे ही कलाकार?
ही कलाकार टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं नाव नारायणी शास्त्री. 'पक पक पकाक' सिनेमा आठवत असेलच. याच सिनेमातील साळू अर्थात नारायणी शास्त्रीला अशा अवतारात बघून नेटकरी थक्क झालेत. 'देखा है पहली बार, साजन की आँखो में प्यार' हे गाणं गात, डफली वाजवत नारायणी भीक मागताना दिसत आहे. अनेकांना नारायणीची ही अवस्था बघून धक्काच बसला. पण व्हिडीओमागचं सत्य समोर आल्यावर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नारायणी ज्या मालिकेत काम करतेय, त्या मालिकेच्या सेटवर तिने हा मजेशीर व्हिडीओ बनवला.
''मी माझा व्यवसाय कधीही बदलू शकते. आणि अत्यंत गांभीर्याने दुसरं काहीतरी करु शकते. म्हणूनच मला अभिनय क्षेत्र आवडतं. तुम्ही एका झटक्यात अनेक गोष्टी करु शकता'', असं कॅप्शन नारायणीने या व्हिडीओला दिलंय. नारायणीच्या या व्हिडीओचं सत्य समोर आल्यावर अनेकांनी तिच्या विनोदबुद्धीचं कौतुक केलंय. नारायणी सध्या हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारत आहे. हिंदी मनोरंजन विश्वात नारायणीने स्वतःची ओळख कमावली आहे.