मुंबईसोडून ही मराठमोळी अभिनेत्री झालीय थेट महाबळेश्वरला शिफ्ट, सांगितलं कसं आहे तिकडचं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 10:03 IST2023-01-06T09:57:30+5:302023-01-06T10:03:51+5:30
अभिनेत्रीने शहर महाबळेश्वर सारख्या हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत जागा खरेदी करत स्वतःचं घर बांधलाय.

मुंबईसोडून ही मराठमोळी अभिनेत्री झालीय थेट महाबळेश्वरला शिफ्ट, सांगितलं कसं आहे तिकडचं आयुष्य
अनेक अभिनेत्री करिअर करण्यासाठी पुण्या-नाशिकमधून मुंबई शहरात येतात. पण आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने शहर महाबळेश्वर सारख्या हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत जागा खरेदी करत स्वतःचं घर बांधलाय.तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यामातून हा खुल्लासा केलायं. ही अभिनेत्री आहे मृण्मयी देशपांडे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आपल्या पर्सनल आणि प्रोफोशनल लाईफचं अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतं.
काही महिन्यांपूर्वी मृण्मयीने सोशल मीडियावर एक घराचा फोटो पोस्ट केला होता. मृण्मयी सध्या कुटुंबासोबत महाबळेश्वरला राहते. याचा उलगडा तिच्याच पोस्टमधून झाला आहे. सोशल मीडियावर तिनं एक फोटो पोस्ट केला आहे. उंदराला सुरक्षित रित्या बाहेर पडण्यासाठी चा मार्ग... सोबत तो इकडे तिकडे भटकू नये म्हणून सैनिक तैनात! असं आहे महाबळेश्वरचं आयुष्य! अशी पोस्ट तिनं सोशल मीडियावर केली आहे.
काही महिन्यांपूर्वीही सोशल मीडियावर मृण्मयीनं घराचा फोटो शेअर केला होता. यासोबत तिनं Dream in progress! जगायला काय लागतं? १०×२० ची आनंदी जागा आणि ज्याच्या बरोबर स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याचा हात... २ वर्षांपासून झगडतो आहोत पण आता मिटल्या डोळ्यांमागचं स्वप्न डोळ्यांसमोर दिसतं आहे... अजून खूप मजल मारायची आहे पण, one step at a time!
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सन मराठी वाहिनीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत दिसतेय. कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात तिने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे.