'सुंदरा मनामध्ये भरली'मधील या अभिनेत्रीनं सोडली मालिका, आता दिसते या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 12:26 IST2022-01-15T12:25:48+5:302022-01-15T12:26:35+5:30
'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhye Bharali) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आलेली असताना या अभिनेत्रीने मालिका सोडल्याचे बोलले जात आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली'मधील या अभिनेत्रीनं सोडली मालिका, आता दिसते या मालिकेत
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhye Bharli)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमध्ये लतिका आणि अभ्या यांची कहाणी दाखवण्यात आली आहे. या मालिकेमध्ये लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) हिने साकारली आहे, तर अभ्याची भूमिका समीर परांजपे (Sameer Paranjape) याने केली आहे. या मालिकेमध्ये इतर कलाकारांनीदेखील त्यांच्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत. अतिषा नाईक हिने देखील अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली आहे. बापूची भूमिका देखील उमेश दामले यांनी साकारली आहे तर सज्जनराव दौलत या भूमिकाही प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. दरम्यान या मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिका सोडल्याचे बोलले जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे गौरी किरण. (Gauri Kiran)
सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत नुकताच बँकेत घोटाळा झाला असल्याचे दाखवले आहे. हा घोटाळा शोधण्याचा सध्या जोरात प्रयत्न सुरू आहे. आता मालिकेचे कथानक हळूहळू पुढे सरकत आहे, असे असताना या मालिकेतील एका अभिनेत्रीने ब्रेक घेतल्यामुळे मालिकेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मालिकेमध्ये लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी किरण हिने मालिका सोडली असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप या वृत्ताला गौरीकडून दुजोरा मिळालेला नाही. या मालिकेमध्ये गौरी हिने लतिकाच्या बहिणीची म्हणजे सुरेखाची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.
आता गौरी किरण ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ या मालिकेमध्ये दिसते आहे. या मालिकेत ती कला ही भूमिका साकारते आहे. त्यामुळे गौरी किरण हिने मालिका सोडली की नाही, हे काही दिवसात कळेल.