TRPच्या शर्यतीत बाजी मारलेल्या 'ठरलं तर मग'ने पार केला १०० भागांचा टप्पा, टीमनं केलं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 14:03 IST2023-03-29T13:56:36+5:302023-03-29T14:03:36+5:30

'आई कुठे काय करते' मालिकेला मागे टाकत जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली होती.

Actress jui gadkari serial tharla tar mag completed 100 episode | TRPच्या शर्यतीत बाजी मारलेल्या 'ठरलं तर मग'ने पार केला १०० भागांचा टप्पा, टीमनं केलं जंगी सेलिब्रेशन

TRPच्या शर्यतीत बाजी मारलेल्या 'ठरलं तर मग'ने पार केला १०० भागांचा टप्पा, टीमनं केलं जंगी सेलिब्रेशन

'ठरलं तर मग’ने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत अलिकडेच  अर्जुन आणि सायलीचे लग्न पार पडले. भलेही हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असले तरीही घरतल्यांसाठी हे कायदेशीर लग्न आहे. त्यानंतर अर्जुन आणि सायलीने लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा ही आनंदात साजरा केला. काही दिवसांपूर्वी या मालिकेने टिआरपीत देखील बाजी मारत पहिल्या क्रमांकावर होती. अर्जुन आणि सायलीच्या या मालिकेने आता १०० भागांचा टप्पा पार केला आहे. मालिकेतील कलाकरांनी सेटवर जंगी सेलिब्रेशन केलं.

प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी ठरलं तर मग मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. कलाकारांनी केक कापून या यशाचा आनंद साजरा केला. या खास प्रसंगी आनंद व्यक्त करताना जुई गडकरी म्हणाली, ‘'मला सायली या भूमिकेसाठी विचारणा झाली तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही. तो पहिला कॉल आज खुप आठवतोय. त्या एका कॉलने माझं आयुष्य बदललं. माझं हे कुटुंब १०० भागांचं  झालं आहे. आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुईला ‘सायली’ दिली.'' 

पुढे ती म्हणाली, ''ही मालिका माझ्यासाठी खुप जास्तं जवळची आहे कारण एका मोठ्या आजारपणातून बाहेर पडताना या मालिकेने मला आपलसं केलं. मी आज एक वेगळं आयुष्य अनुभवतेय. या सेटवर आणि या मालिकेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकामध्ये इतकी सकारात्मकता भरलेली आहे की मला परत मागे वळून बघायचच नाही. मी फक्त ऋणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. मला नेहमी आत्मविश्वास दिला की मी करु शकेन. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा नेहमी पाठीशी असुदे.'' सायली आणि अर्जुनच्या नात्यातले बरेचसे पैलू मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहेत.


 

Web Title: Actress jui gadkari serial tharla tar mag completed 100 episode