२ वर्षांत संसार मोडला, घटस्फोटानंतर एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही; आता १३ वर्षांनी जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हर पुन्हा येणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:26 IST2025-05-28T11:25:51+5:302025-05-28T11:26:34+5:30
जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोव्हर हे एकेकाळी टीव्हीचं लोकप्रिय कपल होतं. या सेलिब्रिटी जोडप्याने लग्नही केलं होतं. मात्र काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ही जोडी एकत्र दिसली नव्हती. आता १३ वर्षांनंतर जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत.

२ वर्षांत संसार मोडला, घटस्फोटानंतर एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही; आता १३ वर्षांनी जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हर पुन्हा येणार एकत्र?
जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोव्हर हे एकेकाळी टीव्हीचं लोकप्रिय कपल होतं. या सेलिब्रिटी जोडप्याने लग्नही केलं होतं. मात्र काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ही जोडी एकत्र दिसली नव्हती. आता १३ वर्षांनंतर जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. करण जोहरच्या 'द ट्रेटर्स' या रिएलिटी शोमध्ये करण आणि जेनिफर एकत्र दिसणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 'द ट्रेटर्स'साठी जेनिफर आणि करणला विचारण्यात आलं होतं. त्या दोघांनीही या शोमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे. १२ जूनपासून अॅमेझॉन प्राइमवर हा शो पाहता येणार आहे. या शोमध्ये कोणते स्पर्धक दिसणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र जेनिफर आणि करणसोबत राज कुंद्रा, रफ्तार, अपूर्वा मुखीजा, मुनव्वर फारुकी, उर्फी जावेद, करण कुंद्रा, जॅस्मीन भसीन यांच्या नावांची चर्चा आहे.
जेनिफर आणि करण 'दिल मिल गए'मध्ये एकत्र दिसले होते. या मालिकेच्या सेटवरच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. २००९ पासून ते रिलेशनशिपमध्ये होते. नंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्नही केलं होतं. मात्र २०१४मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. जेनिफरशी घटस्फोट घेतल्यानंतर करण सिंग ग्रोव्हरने बिपाशा बासूसोबत लग्न केलं. त्यांना देवी ही मुलगी आहे. तर जेनिफरने अद्याप दुसरं लग्न केलेलं नाही.