अली गोनी-जास्मिन भसीनचे गुपचूप लग्न? अभिनेत्रीच्या हातात दिसला लाल चुडा, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:22 PM2022-01-05T19:22:57+5:302022-01-06T11:37:14+5:30

बिग बॉसनंतर चाहत्यांनी टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) च्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.

Actress jasmin bhasin bangle photo hinted married | अली गोनी-जास्मिन भसीनचे गुपचूप लग्न? अभिनेत्रीच्या हातात दिसला लाल चुडा, जाणून घ्या सत्य

अली गोनी-जास्मिन भसीनचे गुपचूप लग्न? अभिनेत्रीच्या हातात दिसला लाल चुडा, जाणून घ्या सत्य

googlenewsNext

बिग बॉसनंतर चाहत्यांनी टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) च्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. अभिनेत्री जास्मिन भसीन शेवटची रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये दिसली होती. जिथे तिने चांगल्या प्रकारे खेळली होती. पण तिला हो शो मध्येच सोडावा लागला होता. शो दरम्यान जास्मिन तिचा चांगला मित्र अलीसोबत खूप चर्चेत आली होती.अचानक अलीने शोमध्ये प्रवेश केला आणि जस्मिनचा आनंद गगनात मावत नव्हता. 

तेव्हापासून दोघांच्या मैत्रीची सोशल मीडियावर चर्चा आहे. बिग बॉसनंतरही दोघेही नेहमी एकत्र दिसतात, कार्यक्रमादरम्यान, वीकेंड किंवा सुट्टीच्या दिवशीही जास्मिन आणि अली एकत्र असतात, दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज चाहत्यांना आहे.

जरी जास्मिन आणि अली नेहमीच एकमेकांना त्यांचे मित्र म्हणून सांगत असले तरी दोघांनीही त्यांचे नातं अजून स्वीकारलेले नाही. मात्र दोघांमधील इतकी घट्ट मैत्री पाहून चाहते दोघांच्या लग्नाचा अंदाज बांधत आहेत. जास्मिनचा हा फोटो पाहून चाहत्यांचा अंदाज अधिक पक्का झाला आहे. जास्मिनने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे पण तिच्या हातात घातलेल्या चुड्याने चाहत्यांना गोंधळात टाकत आहे.

जास्मिनने अलीसोबत लग्न केल्याचे चाहत्यांना वाटते. या फोटोवर एका चाहत्याने जास्मिनला विचारले आणि लिहिले की, तुझ्या हातात बांगड्या, अलीशी लग्न  केलंस का. जास्मिन भसीन आणि अली गोनी यांचे अद्याप लग्न झालेले नाही. जस्मिनचा हा फोटो तिच्या एका म्युझिक व्हिडिओमधील आहे, ज्याचे नाव आहे 'प्यार करते हो ना'. या व्हिडिओमध्ये ती मोहसिन खानसोबत दिसणार आहे.

 

Web Title: Actress jasmin bhasin bangle photo hinted married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.