इतरांना मिळाले लाख तर जान्हवीची किंमत फक्त ४० हजार! अभिनेत्रीने भडकून बोर्ड फाडला, प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:47 IST2024-09-30T13:45:46+5:302024-09-30T13:47:04+5:30

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झाला असून कमी किंमत झाल्याने जान्हवी चांगलीच चिडलेली दिसली (bigg boss marathi 5)

actress jahnavi killekar got angry that abhijeet sawant gave her only 40 thousand bigg boss marathi 5 | इतरांना मिळाले लाख तर जान्हवीची किंमत फक्त ४० हजार! अभिनेत्रीने भडकून बोर्ड फाडला, प्रोमो व्हायरल

इतरांना मिळाले लाख तर जान्हवीची किंमत फक्त ४० हजार! अभिनेत्रीने भडकून बोर्ड फाडला, प्रोमो व्हायरल

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनचा आता शेवटचा अर्थात १० वा आठवडा सुरु झालाय. या सीझनमध्ये १० व्या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा राडा झालेला दिसणार आहे. आज घरात सदस्यांना स्वतःची किंमत ठरवायची आहे. यावेळी सर्वात कमी रक्कम मिळाल्याने जान्हवीने रागाच्या भरात बोर्ड फाडून फेकून दिलाय. त्यामुळे घरातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसलं.

कमी किंमत मिळाल्याने जान्हवी नाराज

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. आज घरातल्यांना ठरवायचं आहे या घरातील स्वतःची किंमत, अशी बिग बॉस घोषणा करतात. या प्रोमोत अभिजीतने अंकिताला ४ लाख तर जान्हवीला ४० हजार रुपये दिले. त्यामुळे निक्कीने त्याला टोकलं. "तू जान्हवीला ४० हजार देणारेय?" तेव्हा जान्हवी चांगलीच रागावलेली दिसली. ती म्हणाली, "या घरातली माझी किंमत ४० हजार नाहीय. बिग बॉस मी ही पाटी स्वीकारणार नाही." असं म्हणत जान्हवीने तिला दिलेला बोर्ड फाडला. याशिवाय तिच्या डोळ्यांतून पाणी आलं.


बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा सुरु

बिग बॉस मराठीचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झालाय. हा आठवडा फिनाले वीक म्हणून ओळखला जातोय. काल घरातून पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी बाहेर पडला. त्यामुळे घरात आता ७ सदस्य बाकी आहेत. यापैकी १ सदस्य या आठवड्यात मिड वीक एविक्शनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे उर्वरीत टॉप ६ फिनालेपर्यंत मजल मारतील. गेले दोन आठवडे भाऊचा धक्क्यावर न दिसलेला अभिनेता रितेश देशमुख या आठवड्यात ग्रँड फिनालेचं होस्टिंग करण्यासाठी पुन्हा दिसणार आहे.

Web Title: actress jahnavi killekar got angry that abhijeet sawant gave her only 40 thousand bigg boss marathi 5