”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 19:51 IST2020-09-29T19:46:25+5:302020-09-29T19:51:12+5:30

झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली.

Actress gautami deshpande shared new photoshoot | ”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले घायाळ

”माझा होशील ना” फेम गौतमी देशपांडेने शेअर केले फोटोशूट, चाहते झाले घायाळ

झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमीवेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये गौतमी वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. गौतमीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहे. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात पदार्पण
 अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.अभिनयाशिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  गौतमी गाण्याचा वारसा तिला तिच्या आजीकडून आला आहे.

Web Title: Actress gautami deshpande shared new photoshoot