'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा तिचा स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 13:22 IST2022-01-03T13:16:23+5:302022-01-03T13:22:05+5:30

मालिकेत अन्विता (Anvita Phaltankar)ने साकारलेली स्वीटूच्या भूमिकाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Actress Anvita Phaltankar saree glamour photos on instagram | 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा तिचा स्वॅग

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, पाहा तिचा स्वॅग

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) मालिकेत रोज नवे टि्वस्ट आणि टर्नस येतात. अनेक अडचणींना पार करुन काही दिवसांपूर्वी स्वीटू आणि ओम लग्नाच्या बेडीत अडकले, पण सासरी आपल्यावरही स्वीटू मालविकाच्या कट कारस्थानांना सामोऱ्य जावंच लागतंय. मालिकेत साधी आणि सोज्वळ दिसणारी स्वीटू खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे.

अन्विता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असून अनेकदा ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. अन्विता (Anvita phaltankar )ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती वनपीस आणि पायात यलो रंगाच्या शूजमध्ये दिसतेय. Swag se swagat maacha असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. अन्विताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अन्विताला अभिनयासोबतच डान्सचीही विशेष आवड आहे.चार वर्षांची असताना भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.

या मालिकेत अन्विता (Anvita Phaltankar)ने साकारलेली स्वीटूच्या भूमिकाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज अन्विताचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

स्वीटूने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.रवी जाधव दिग्दर्शिक 'टाईमपास'मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती. यानंतर 2019मध्ये आलेल्या गर्ल्स या सिनेमात अन्वितान 'रुमी'च्या भूमिकेत झळकली होती. Why so गंभीर या नाटकातही तिने काम केलं आहे.मात्र, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.

Web Title: Actress Anvita Phaltankar saree glamour photos on instagram