अभिनेत्री अक्षया देवधर शेअर साडीतला फोटो, चाहते म्हणाले- बाई फारच गोड दिसताय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 17:15 IST2020-11-19T17:06:35+5:302020-11-19T17:15:21+5:30
क्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर शेअर साडीतला फोटो, चाहते म्हणाले- बाई फारच गोड दिसताय
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिला सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोईंग आहे. अलीकडेच अक्षयने स्वत:चे साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गडद निळ्या रंगाच्या साडीत तिचे सौदर्य आणखी खुलून आल्याचं दिसते आहे. अक्षयाच्या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, बाई फारच गोड दिसताय तुम्ही.. तर कुणी क्वीन, प्रिटी, गॉर्जिअस अशा कमेंट केल्या आहेत.
तिने तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. पाठक बाई म्हणून अक्षया घराघरात पोहोचली.
अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. तितकाच ऑफस्क्रीन अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेते आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या याच सोज्वळ लूकची झलक बघायला मिळते.