रेवती लेलेनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:16 IST2026-02-23T12:15:15+5:302026-02-23T12:16:07+5:30

मराठी मनोरंजनविश्वात वाजतायेत सनई चौघडे, आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकली

actress aetashaa sansgiri married to actor nishad bhoir in grand wedding ceremony yesterday | रेवती लेलेनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

रेवती लेलेनंतर आणखी एका मराठी अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, नवराही आहे प्रसिद्ध अभिनेता

सध्या मराठी मनोरंजनविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री रेवतीत लेलेने लग्नगाठ बांधली. तर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. कालच अभिनेत्रीने प्रसिद्ध मराठी अभिनेत्यासोबतच आयुष्यभराची गाठ बांधली. त्यांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटीही आले होते. कोण आहे ही अभिनेत्री?

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

तर ही अभिनेत्री आहे एतशा संझगिरी. 'राजा राणीची गं जोडी','निवेदिता माझी आई','छोटी मालकीण' अशा मालिकांमध्ये दिसलेली एतशाने अभिनेता निषाद भोईरसोबत सातफेरे घेतले. कालच त्यांचा लग्नसोहळा थाटात संपन्न झाला. त्याआधी तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो, व्हिडीओही व्हायरल झाले होते. लग्नात एतशाने गडद जांभळ्या रंगाची साडी, सोन्याचे दागिने, हातात सोन्याच्या पाटल्या आणि हिरव्या बांगड्या परिधान केल्या होत्या. तर निषाद भोईर क्रीम रंगाची शेरवानीमध्ये छान दिसत होता. त्याने  गळ्यात गडद जांभळ्या रंगाचं उपरणं घेतलं होतं. निषाद आणि एतशाने लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 


निषाद आणि एतशा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी साखरपुडा केला होता. एतशा सध्या 'तुझ्या सोबतीने' या मालिकेत काम करत आहे. ती नुपूर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर निषाद भोईर नुकताच 'गोंधळ' या मराठी सिनेमात दिसला.  शिवाय तो 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत काम करत आहे. याआधी तो 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेत दिसला होता. 

Web Title : मराठी अभिनेत्री एतशा संझगिरी ने अभिनेता निषाद भोईर से भव्य समारोह में शादी की

Web Summary : रेवती लेले के बाद, मराठी अभिनेत्री एतशा संझगिरी ने अभिनेता निषाद भोईर से शादी की। शादी में इंडस्ट्री के सेलेब्रिटीज शामिल हुए। 'राजा रानी ची गा जोड़ी' में भूमिकाओं के लिए जानी जाने वाली एतशा बैंगनी साड़ी में बहुत खूबसूरत लग रही थीं। निषाद ने क्रीम शेरवानी पहनी थी। वे सालों से डेटिंग कर रहे थे और पिछले अक्टूबर में उनकी सगाई हुई थी।

Web Title : Marathi Actress Etasha Sanzgiri Marries Actor Nishad Bhoir in Grand Ceremony

Web Summary : Following Revati Lele, Marathi actress Etasha Sanzgiri married actor Nishad Bhoir. The wedding was attended by industry celebrities. Etasha, known for roles in 'Raja Rani Chi Ga Jodi' and others, looked stunning in a purple saree. Nishad wore a cream sherwani. They have been dating for years and got engaged last October.