​‘खिचडी’ या मालिकेद्वारे ही अभिनेत्री करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 08:56 AM2017-12-04T08:56:37+5:302017-12-04T14:26:37+5:30

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली, नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या ...

Actor will return to small screens through 'Khichdi' series! | ​‘खिचडी’ या मालिकेद्वारे ही अभिनेत्री करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन!

​‘खिचडी’ या मालिकेद्वारे ही अभिनेत्री करणार छोट्या पडद्यावर पुनरागमन!

googlenewsNext
०४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली, नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
‘खिचडी’ या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. या मालिकेत प्रेक्षकांना हंसाच्या भूमिकेत सुप्रिया पाठकलाच पाहायला मिळणार असल्याने या मालिकेचे फॅन्स चांगलेच खुश आहेत. हंसाचे व्हॉट इज प्रफुल्ल असे विचारणे, हंसा आणि प्रफुल्लची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हंसा या भूमिकेद्वारे सुप्रिया पाठक अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा काम करणार आहेत. सुप्रिया पाठक यांनी आजवर कलयुग, विजेता, सरकार, ऑल इज वेल, गलियों की रासलीला राम लीला यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हंसा या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. त्यामुळे ही भूमिका पुन्हा साकारण्य़ासाठी सुप्रिया पाठक खूपच उत्सुक आहेत. आपल्या या भूमिकेविषयी बोलताना सुप्रिया पाठक यांनी सांगितले, “खिचडी या मालिकेत पुन्हा काम करण्याच्या कल्पनेनेच मी अतिशय उत्साहित झाले आहे; कारण त्यातील माझी हंसाची व्यक्तिरेखा ही मी रंगविलेली आजवरची सर्वात चांगली विनोदी व्यक्तिरेखा आहे. या मालिकेची टीम ही मला एखाद्या कुटुंबासारखीच वाटते. या मालिकेत पुन्हा काम करणे म्हणजे बऱ्याच वर्षांनी स्वगृही परतण्यासारखे आहे. आता नव्या स्वरूपात, परंतु जुन्याच कलाकारांसोबत पुन्हा याच मालिकेत काम करणे ही फारच मजेची गोष्ट असणार आहे.”
खिचडी या मालिकेची लोकप्रियता वाढविण्यासाठी त्यात रेणुका शहाणेसारख्या काही नव्या कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या धमाल विनोदी टिप्पणीने आणि विनोदाच्या अचूक टायमिंगद्वारे या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांमध्ये हास्याची कारंजी निर्माण करतील यात काहीच शंका नाही. 

supriya pathak


Also Read : दिल तो पागल है या चित्रपटातील ​बलविंदर सिंग झळकणार खिचडी या मालिकेत

Web Title: Actor will return to small screens through 'Khichdi' series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.