"अशी व्यक्ती फक्त नशीब...", सुयश टिळकच्या बायकोची पोस्ट चर्चेत, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:51 IST2022-10-21T16:46:29+5:302022-10-21T16:51:53+5:30
सोशल मीडिया दोघंही अॅक्टिव्ह असतात. एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ते नेहमीच शेअर करत असतात.

"अशी व्यक्ती फक्त नशीब...", सुयश टिळकच्या बायकोची पोस्ट चर्चेत, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) आणि आयुषी भावे ( Aayushi Bhave) हे मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय कपल. लग्नानंतर हे कपल नेहमीच चर्चेत असतं. सोशल मीडिया दोघंही अॅक्टिव्ह. एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ते नेहमीच शेअर करत असतात. नुकताच आयुषीने एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुयश आणि आयुषीच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे त्यानिमित्ताने तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला सांभाळून घेते.अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते जसा की तू… happy wedding anniversary dear husband असं कॅप्शने तिने या व्हिडीओला दिलं आहे.
‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश घराघरात पोहोचला. मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जाऊ लागला. याच सुयशच्या आयुष्यात आयुषीची एन्ट्री झाली ती 2018 साली. होय, 2018 साली ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेत आयुषी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि सुयश या कार्यक्रमात त्याच्या एका मालिकेचं प्रमोशन करायला गेला होता. या कार्यक्रमात सुयशने आयुषीला पहिल्यांदा पाहिलं. आयुषी माझ्या आयुष्यात येण्याचं कारण म्हणजे श्रावण क्वीन स्पर्धा, असं आयुष सांगतो तो त्याचमुळे.
वर्षभरानंतर पुन्हा आयुषी व सुयश भेटले आणि तेही श्रावण क्वीन स्पर्धेच्या निमित्तानेच. होय, सुयश या कार्यक्रमाचा होस्ट होता आणि आयुषीला गतवर्षीची विजेती म्हणून या कार्यक्रमात बोलवलं गेलं होतं. तिथे बºयापैकी ओळख झाली. मग दोघांनीही एकमेकांना इन्स्टावर फॉलो केलं. इन्स्टावर दोघांचंही बोलणं सुरू झालं. बघता बघता दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. आयुषी सध्या हिंदी मालिका रज्जोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारतेय.