रामायण मालिकेत सुग्रीवाच्या भूमिकेत असलेले श्याम सुंदर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 15:07 IST2020-04-09T15:04:11+5:302020-04-09T15:07:32+5:30

रामायण या मालिकेत सुग्रीवाच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराचे नुकतेच निधन झाले. 

Actor Shyam Sundar Aka Ramayana's 'Sugriva' Passes Away PSC | रामायण मालिकेत सुग्रीवाच्या भूमिकेत असलेले श्याम सुंदर यांचे निधन

रामायण मालिकेत सुग्रीवाच्या भूमिकेत असलेले श्याम सुंदर यांचे निधन

ठळक मुद्देरामायण या मालिकेत सुग्रीवाची भूमिका श्याम सुंदर कलानी यांनी साकारली होती. ते गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सर या रोगाने त्रस्त होते. त्यांचे  हरयाणामधील कालका येथे निधन झाले.

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याच मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे छोट्या पडद्यावर गाजलेल्या जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. रामायण ही मालिका गेल्याच आठवड्यात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली असून या मालिकेला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. पण आता या मालिकेच्या संबंधित एक वाईट बातमी आली आहे. या मालिकेत सुग्रीवाच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराचे सहा एप्रिलला निधन झाले. 

रामायण या मालिकेत सुग्रीवाची भूमिका श्याम सुंदर कलानी यांनी साकारली होती. ते गेल्या कित्येक दिवसांपासून कॅन्सर या रोगाने त्रस्त होते. त्यांचे  हरयाणामधील कालका येथे निधन झाले. रामायण मालिकेत रामाच्या भूमिकेत असलेल्या अरुण गोविल यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

अरुण गोविल यांनी ट्वीट करत श्याम सुंदर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, रामानंद सागर यांच्या रामायणात सुग्रीवाच्या भूमिकेत असलेले श्याम सुंदर याचे निधन झाल्याचे नुकतेच कळले. ते खूपच चांगले व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो...

रामायण या मालिकेत लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेल्या सुनील लहरी यांनी देखील श्याम यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, श्याम कलानी यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला. रामायण या मालिकेत त्यांनी सुग्रीवाची भूमिका साकारली होती. देव त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती देवो...

श्याम सुंदर यांनी त्यांच्या करियरची सरुवात रामायण या मालिकेपासूनच केली होती. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली असली तरी श्याम यांना या मालिकेनंतर अभियक्षेत्रात तितक्याशा चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत.    

Web Title: Actor Shyam Sundar Aka Ramayana's 'Sugriva' Passes Away PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ramayanरामायण