अभिनेता शशांक केतकर 'मुरांबा' मालिकेचं शूटिंग करतोय थेट लंडनमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 18:24 IST2023-04-24T18:23:51+5:302023-04-24T18:24:24+5:30

'मुरांबा' (Muramba) मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील रमा-अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते.

Actor Shashank Ketkar is shooting for 'Muramba' serial directly in London! | अभिनेता शशांक केतकर 'मुरांबा' मालिकेचं शूटिंग करतोय थेट लंडनमध्ये!

अभिनेता शशांक केतकर 'मुरांबा' मालिकेचं शूटिंग करतोय थेट लंडनमध्ये!

स्टार प्रवाहवरील मुरांबा (Muramba) मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील रमा-अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) सध्या लंडनमध्ये एका सिनेमाचे शूटिंग करत असल्यामुळे मालिकेच्या कथानकात तो कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याचे दाखवण्यात आले आहे.

फोनच्या माध्यमातून तो रमाच्या आणि कुटुंबियांच्या सतत संपर्कात असतो. फोनवरील संभाषणाचे हे सीन शशांक स्वत: त्याच्या मोबाईलवर शूट करतोय आणि तेही लंडनमधून. या सीन्सच्या निमित्ताने प्रेक्षकांनाही लंडनच्या नयनरम्य ठिकाणांचं दर्शन होत आहे. याआधीही शशांकने मुरांबा मालिकेसाठी असे सीन शूट केले होते.

परदेशातील शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना शशांक म्हणाला, ‘मला झोकून देऊन काम करायला आवडतं. प्रोजेक्ट कुठलंही असो मी माझे शंभर टक्के देतो. जेव्हा स्टार प्रवाहसारखी वाहिनी, पॅनोरमा सारखं प्रोडक्शन हाऊस, सहकलाकार आणि पडद्यामागची संपूर्ण टीम जेव्हा मला माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी सहकार्य करतात तेव्हा माझीही जबाबदारी असते की मी देखील माझ्या टीमला संपूर्ण सहकार्य करायला हवे. त्यामुळेच मुरांबा मालिकेचे काही सीन्स मी परदेशातून माझ्या मोबाईलवरुनच शूट करायचे ठरवले.

मालिकांचं बरचसं शूटिंग मुंबईमध्ये होते. परदेशातलं लोकेशन जर मालिकेत दिसले तर प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असते. त्यामुळेच प्रेक्षकांसाठी मी मुरांबा मालिकेसाठी काही सीन्स शूट करुन पाठवतोय. मायदेशी मी लवकरच परतणार आहे. तेव्हा पुन्हा भेटुच. पाहायला विसरु नका मुरांबा सोमवार ते शनिवार दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Web Title: Actor Shashank Ketkar is shooting for 'Muramba' serial directly in London!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.