शूटिंगवेळी समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 21:21 IST2026-03-29T21:21:04+5:302026-03-29T21:21:23+5:30
Rahul Arunoday Banerjee News: बंगालमधील प्रसिद्ध अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं आकस्मिक निधन झालं आहे. तो ४३ वर्षांचा होता. शूटिंगदरम्यान, झालेल्या दुर्घटनेत राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं निधन झाल्याच सांगण्यात येत आहे. त्याच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

शूटिंगवेळी समुद्रात बुडून प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा
बंगालमधील प्रसिद्ध अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं आकस्मिक निधन झालं आहे. तो ४३ वर्षांचा होता. शूटिंगदरम्यान, झालेल्या दुर्घटनेत राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं निधन झाल्याच सांगण्यात येत आहे. त्याच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल अरुणोदय बॅनर्जी ओदिशामधील तालसरी येथे शूटिंग करत होता. त्यावेळी तो समुद्रात उतरला. तसेच अचानक पाण्यात बुडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या तंत्रज्ञांनी त्याला बाहेर काढले आणि त्वरित रुग्णालयात नेले. मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाही.
राहुल अरुणोदय बॅनर्जी हा भोले बाबा पार करेगा नावाच्या मालिकेचं चित्रिकरण करत होता. याच मालिकेच्या चित्रिकरणासाठी तो दीघा येथील तालसरी समुद्र किनारी गेला होता. त्याचदरम्यान रविवारी ही दुर्घटना घडली. राहुल याला गंभीर अवस्थेत दीघा येथील जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चित्रिकरण संपल्यानंतर राहुल समुद्रात उतरला. तसेच यादरम्यान, अचानक तो पाण्यात बुडाला. सुमारे तासाभरानंतर खूप खटपटी करून त्याला बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.