अभिनेता पुरब कोहलीचा धक्कादायक खुलासा,लग्नापूर्वीच पुरबची पत्नी ल्युसी होती प्रेग्नंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 11:08 IST2016-12-29T10:54:53+5:302016-12-29T11:08:23+5:30

‘पीओडब्ल्यू- बंदी युध्द के’ मालिकेतील दमदार भूमिकेमुळे अभिनेता पूरब कोहलीवर सध्या  रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र पुरब कोहलीने ...

Actor Purab Kohli's shocking revelation, Priya's wife Lucy was pregnant before marriage | अभिनेता पुरब कोहलीचा धक्कादायक खुलासा,लग्नापूर्वीच पुरबची पत्नी ल्युसी होती प्रेग्नंट

अभिनेता पुरब कोहलीचा धक्कादायक खुलासा,लग्नापूर्वीच पुरबची पत्नी ल्युसी होती प्रेग्नंट

ीओडब्ल्यू- बंदी युध्द के’ मालिकेतील दमदार भूमिकेमुळे अभिनेता पूरब कोहलीवर सध्या  रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र पुरब कोहलीने त्याच्या  आयुष्यासंदर्भात एक खाजगी गोष्ट मिडियासोबत शेअर केली आहे.ती म्हणजे ल्युसी आणि पुरब कोहली बरेच वर्षापासून रिलेशनशीपमध्ये होते. आणि त्यातूनच काही दिवसांनंतर पुरबची गर्लफ्रेड ल्युसीही प्रेग्नंट राहिली. ल्युसीनेही मोठ्या आनंदाने ही गुड न्युज पुरबसह शेअर केली, मात्र लग्नापूर्वीच त्याची गर्लफ्रेंड पुरबच्या बाळाची आई होणार या गोष्टींत पुरबला कुठेही गैर वाटले नाही.विशेष म्हणजे आमचे बाळही आमच्या लग्नाची साक्ष बनेल असाच मी विचार केला होता.उलट पुरबच्या कुटुंबानेही दोघांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता.मात्र लग्न करण्यास पुरबनेच नकार दिला होता.कारण ल्युसीही प्रेग्नंट असल्यामुळे पुरबला लग्नबंधनात अडकायचे नव्हते. लग्न करण्यासाठी त्यांचे होणारे बाळ याला कारणीभूत ठरू नये म्हणून पुरबने ल्युसीशी लग्न केले नाही.काही दिवसांनंतर ल्युसीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. इनाया असे तिचे नावही ठेवण्यात आले.एक पिता बनण्याचा पुरबला तर आनंद तर होतोय. मात्र आणखी एक गोष्ट पुरब कोहलीला सतावतेय. ती म्हणजे तो  त्याच्या मुलीला वेळ देवू शकत नसल्याची खंत त्याला सतावतेय. मालिका म्हटले की तासनतास सूरू असणा-या शूटिंगमुळे पुरबला त्याच्या कुटुंबासाठी वेळच उरत नाही. 

याविषयी पुरब सांगतो. ''प्यार किया तो डरना क्या'',लग्नापूर्वीच आमचे बाळ या जगात आले यांत इतरांना गैर वाटत असावे मला वाटत नाही. उलट या गोष्टीचा मी सकारात्मक दृष्टीने विचार केला.माझ्या कुटुंबानेही मला या गोष्टीत खूप सपोर्ट केलाय.इतर काय बोलतील याचा मी विचार न करता ल्युसीला सपोर्ट केला आणि तिच्या प्रेग्नंसीत फक्त ल्युसीनेच नाहीतर मी ही खूप एंन्जॉय केलंय.खरेच पिता झाल्यावर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे आणि हा चांगला बदल असल्याचे पूरबने म्हटले आहे.“तुम्ही पिता बनलात की सार्‍या गोष्टी बदलतात.पण पिता होण्याची पूर्वतयारी तुम्हाला करताच येत नाही.विशेषत: तुम्ही एका मुलीचे बाप बनणार असलात तर जबाबदारी वाढल्यासारखे वाटते,पिता बनल्यावर तुम्ही स्वत:साठी जगणं थांबवता,”निव्वळ प्रथा आहे म्हणून किंवा सामाजिक रूढींच्या दबावापुढे झुकणारा मी नाहीय माझ्यावर एक जबाबदारी आहे. ल्युसी आणि इनाया हे माझे आयुष्य आहेत.त्यामुळे काही गोष्टीचा बाऊ करण्यापेक्षा त्याचा आनंद घ्या असेही पुरबने म्हटले आहे.

Web Title: Actor Purab Kohli's shocking revelation, Priya's wife Lucy was pregnant before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.