अभिनेत्री नेहा जोशीला आदेश भाऊजींकडून मिळाले एक खास सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 10:49 IST2017-02-02T05:19:40+5:302017-02-02T10:49:40+5:30

''पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातूनी वेळ काढुनी खेळ खेळुया जरा होममिनिस्टर... '' हे सुर गुंजताच घराघरांतल्या होम होममिनिस्टर वेळ न ...

Actor Neha Joshi received a special surprise from Bhauji | अभिनेत्री नेहा जोशीला आदेश भाऊजींकडून मिळाले एक खास सरप्राईज

अभिनेत्री नेहा जोशीला आदेश भाऊजींकडून मिळाले एक खास सरप्राईज

'
;'पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातूनी वेळ काढुनी खेळ खेळुया जरा होममिनिस्टर... '' हे सुर गुंजताच घराघरांतल्या होम होममिनिस्टर वेळ न चुकवता हा कार्यक्रम घरबसल्या फुल ऑन एन्जॉय करत असतात. प्रत्येक गृहिणीला या कार्यक्रमात आपणही सहभागी होत पैठणी जिंकण्याची इच्छा असते. हाच मोह अभिनेत्रींनीही पडत असतो. आता पर्यंत अनेक अभिनेत्रींनी या कार्यक्रमात भाऊजी आदेश बांदेकर यांच्याशी मनमोकळा संवाद साधत, पैठणी जिंकत सा-यांचे मनोरंजन केल्याचे आपण पाहिले आहे.  असाच एक खास भाग या कार्यक्रमात रंगला.यावेळी अभिनेत्री नेहा जोशी, हेमंत ढोमे, जितेंद्र जोशी,अनिकेत विश्वासराव,  अभिनेत्री रसिका सुनील, संगीतकार- गायक अमितराज यांनी या भागात विशेष उपस्थिती लावली होती. या कलाकरांसह आदेश बांदेकर यांनी आपल्या खास शैलीत या सगळ्यांना बोलते केले. मात्र होममिनिस्टरमध्ये रंगलेल्या या खास भागात नेहा जोशीने पैठणी जिकंली.



याविषयी नेहा म्हणते कि,होममिनिस्टरमध्ये इतरांप्रमाणे माझीही पैठणी साडी जिंकण्याची इच्छा पूर्ण झाली असेच मी म्हणेन,मला खूपच आनंद झाला आहे.कारण साडी हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यातून पैठणी म्हणजे अप्रतिमच . मला खर आश्चर्य वाटायचं कि होम मिनिस्टर हा कार्यक्रम  रसिकांना इतका का आवडतो आणि इतके वर्ष कसा आवडू शकतो पण याच उत्तर मला तिथे गेल्यावर मिळाल.आदेश दादा सगळ्यांशी खुप प्रेमाने बोलतो.तिथे खुप खेळी मेळीच वातावरण असतं . आदेश दादाने चेष्टा जरी केली तरी कोणालाही त्या गोष्टीचे  वाईट वाटत नाही त्याऊलट सगळेच खूप एन्जॉय करत असतात. माझा मराठी सिनेमा 'बघतोस काय मुजरा' या सिनेमाच्या प्रमोशनिमित्त या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

Web Title: Actor Neha Joshi received a special surprise from Bhauji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.