​‘पिया अलबेला’तील भूमिकेसाठी हा अभिनेता शिकला तबलावादन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 13:14 IST2017-05-10T07:44:21+5:302017-05-10T13:14:21+5:30

मालिकेतील भूमिका असो किंवा सिनेमातील भूमिका रंगवण्यासाठी अनेक कलाकार खूप मेहनत घेत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.त्यांच्या मेहनतीमुळेचत्यांनी रंगलवलेल्या भूमिक ...

Actor learned to play 'Piya Albella' tablaadan! | ​‘पिया अलबेला’तील भूमिकेसाठी हा अभिनेता शिकला तबलावादन!

​‘पिया अलबेला’तील भूमिकेसाठी हा अभिनेता शिकला तबलावादन!

लिकेतील भूमिका असो किंवा सिनेमातील भूमिका रंगवण्यासाठी अनेक कलाकार खूप मेहनत घेत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.त्यांच्या मेहनतीमुळेचत्यांनी रंगलवलेल्या भूमिक रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात.याच यादीत आपलेही नाव घेतले जावे यासाठी  रोहन राय हा अभिनेताही खूप मेहनत करत असल्याचे समजते.होय,संगीत वाद्य वाजवितानाचा अभिनय करणे हे वाटते तितके सोपे नसते. बरेच अभिनेते वाद्य वाजविण्याचा अभिनय करताना ते चुकीच्या पध्दतीने हाताळत असतात. ऑनस्क्रीन वाद्य वाजवण्याचा अभिनय अस्सल उतरावा,कलाकार रोहन रायने तबला वादनाचे रितसर प्रशिक्षण घेतले आहे.रोहन राय ‘पिया अलबेला’ या मालिकेत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून  रोहनला अनेक वाद्य वाजविता येत असून कोणतेही नवे वाद्य तो कमी वेळात शिकू शकतो. तो चार वर्षांचा असल्यापासून विविध वाद्ये वाजवीत असून तो आता काँगो, बाँगो, जेम्बे,बासरी, तबला आणि हार्मोनियम ही वाद्ये वाजवू शकतो.मात्र या सगळ्या वाद्यांमध्ये त्याला  तबला वाजवणे जमत नव्हते. यासाठी त्याने वेळेत वेळ काढून तबल्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली.नवनवी वाद्ये शिकण्याच्या आपल्या आवडीबद्दल रोहन म्हणाला,“पिया अलबेला’च्या आगामी कथानकाची मला खूपच उत्सुकता लागली आहे. या कथानकामुळे मला तबला शिकण्याची संधी मिळाली.नवनवी वाद्यं वाजविण्यास शिकणं ही माझी आवड आहे. मी चार वर्षांचा असल्यापासून वाद्यं वाजवण्यास शिकतो आहे.मला तबला शिकण्याची खूप इच्छा होती, पण आजवर तबला वाजविण्याची संधी मला मिळाली नव्हती. मला मॉडेलिंगच्या कामामुळे तबला शिकण्यास वेळ उपलब्ध झाला नाही.आता या मालिकेत ते मला तबला वाजविताना दाखविणार आहेत, हे समजल्यावर मी तबला शिकण्याची ही संधी पटकाविली. तबला वाजविण्यास शिकणं हे माझं स्वप्न होतं आणि आता त्यासाठी मला व्यावसायिक कारणही मिळालं आहे. माझा तबला वाजवितानाचा अभिनय अस्सल वाटला पाहिजे.म्हणून मी वास्तव जीवनात तबला वाजविण्यास शिकत आहे. प्रेक्षकांना माझा हा अभिनय पसंत पडेल,अशी आशा आहे.”‘पिया अलबेला’च्या आगामी भागात प्रेक्षकांना दिसेल की नरेनची आई सुप्रिया (ज्योती गौबा) हिला चांदनी (सुहानी धनकी) सांगते की तिला पूजा आणि नरेनला पाहिल्यावर राधाकृष्णाच्या जोडीची आठवण येते. सुप्रियाला ही तुलना ऐकून आनंद होतो आणि तिला वाटते की पूजा आणि नरेन यांची जोडी चांगली जमेल.पूजा आणि नरेनची मैत्री नवे वळण घेईल काय? नरेन आणि पूजासाठी सुप्रियाच्या कोणत्या योजना आहेत? अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं येणा-या भागात स्पष्ट होईल.


Web Title: Actor learned to play 'Piya Albella' tablaadan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.