प्रेम करावं तर असं! मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालाय बॉलिवूड अभिनेता, छातीवरच काढलाय तिचा टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:54 IST2026-02-25T09:53:25+5:302026-02-25T09:54:02+5:30
कधी कधी कलाकार प्रेमात इतके वेडे होतात की ते आपल्या पार्टनरसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक बॉलिवूड अभिनेता मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे.

प्रेम करावं तर असं! मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालाय बॉलिवूड अभिनेता, छातीवरच काढलाय तिचा टॅटू
सिनेइंडस्ट्रीतील लव्हस्टोरी हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. कलाविश्वातील काही सेलिब्रिटी कपल हे लोकप्रियदेखील आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणूनही पाहिलं जातं. अनेकदा सेलिब्रिटींच्या डेटिंगच्या चर्चांही रंगल्याच्या पाहायला मिळतं. कधी कधी कलाकार प्रेमात इतके वेडे होतात की ते आपल्या पार्टनरसाठी काहीही करायला तयार असतात. असाच एक बॉलिवूड अभिनेता मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. आणि त्याने तिचा टॅटू छातीवर कोरला आहे.
हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आणि बॉलिवूड अभिनेता करण कुंद्रा अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या प्रेमात आहे. करण आणि तेजस्वी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक इव्हेंटमध्येही ते एकत्र दिसतात. तेजस्वीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करणने त्याच्या छातीवर अभिनेत्रीचा टॅटू काढला आहे. मुंबईत झालेल्या एका रमजान पार्टीत करण कुंद्रा सहभागी झाला होता. यावेळी त्यांने तेजस्वीच्या चेहऱ्याचा छातीवर काढलेला टॅटू फ्लॉन्ट केला. त्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
करण आणि तेजस्वी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते लिव्ह इनमध्येही राहतात. सध्या ते दोघेही लाफ्टर शेफमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. करण आणि तेजस्वी ही इंडस्ट्रीतील लाडके कपल आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चाही अनेकदा रंगताना दिसताता. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.