'प्रेम म्हणजे नको ते संकट'; लग्नानंतर अक्षयाला असं का म्हणतोय हार्दिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:58 IST2023-08-03T12:58:06+5:302023-08-03T12:58:35+5:30

Hardik joshi:अक्षया आणि हार्दिक बऱ्याचदा एकमेकांसोबतचे रोमॅण्टिक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. परंतु, यावेळी तिने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे.

actor-hardik-joshi-saying-pyar bekar ki musibat hai video is-going-viral-after-the-wedding | 'प्रेम म्हणजे नको ते संकट'; लग्नानंतर अक्षयाला असं का म्हणतोय हार्दिक?

'प्रेम म्हणजे नको ते संकट'; लग्नानंतर अक्षयाला असं का म्हणतोय हार्दिक?

तुझ्यात जीव रंगला म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडलेली जोडी म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar) आणि हार्दिक जोशी (hardik joshi). या दोघांनी पहिल्यांदाच एका मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली आणि या मालिकेच्या सेटवरच ते प्रेमात पडले. विशेष म्हणजे मैत्रीपासून सुरु झालेला यांचा प्रवास लग्नापर्यंत येऊन पोहोचला. ४ डिसेंबरला या जोडीने लग्न केलं. लग्नानंतर ही जोडी त्यांच्यातील प्रेमामुळे सातत्याने चर्चेत येत आहे. परंतु, आता ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.

अक्षया आणि हार्दिक बऱ्याचदा एकमेकांसोबतचे रोमॅण्टिक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यावेळीदेखील अक्षयाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनीही 'जाने क्यू लोग प्यार करते है' या गाण्यावर एक रिल केलं आहे. यामध्ये 'प्यार बेकार की मुसीबत हैं', अशी एक ओळ आहे. ही ओळ हार्दिकने गायल्यामुळे अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

दरम्यान,  'राणादाला सुद्धा तुम्ही गाणी गायला लावली राव अस कुठ असतय व्हय', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, लग्नाची दोस्ती हाय न्हव मग हे सगळ प्रश्न कसे काय? असं अन्य एकाने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी या जोडीने जेजूरीला जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलं होतं. यावेळचा त्यांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.
 

Web Title: actor-hardik-joshi-saying-pyar bekar ki musibat hai video is-going-viral-after-the-wedding