अभिनेता आकाशदीप सहगल भूमिकेसाठी घेतोय अशाप्रकारे मेहनत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 17:05 IST2017-02-16T10:06:14+5:302017-02-16T17:05:48+5:30
‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेतील भूमिकेद्वारे तब्बल चार वर्षांनंतर टीव्ही मालिकांमध्ये पुनरागमन करीत असलेला लोकप्रिय अभिनेता आकाशदीप सहगल ...

अभिनेता आकाशदीप सहगल भूमिकेसाठी घेतोय अशाप्रकारे मेहनत?
‘ ेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेतील भूमिकेद्वारे तब्बल चार वर्षांनंतर टीव्ही मालिकांमध्ये पुनरागमन करीत असलेला लोकप्रिय अभिनेता आकाशदीप सहगल स्वत:ला ‘स्कायवॉकर सहगल’ म्हणवून घेतो. या मालिकेत तो रणजितसिंग यांचा शत्रू पीर मुहम्मद याची भूमिका साकारीत आहे.आता टीव्ही मालिकांमध्ये परतत असताना या भूमिकेला आणि मालिकेला सर्वस्व देण्याची त्याची इच्छा आहे. यामुळे आपले पुनरागमन परिणामकारक आणि अचूक ठरेल, असे त्याला वाटते. म्हणून तो सेटवर आपल्याशी संबंधित सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवत आहे. आपला लुक असो, वेशभूषा असो की संवाद, यापैकी सर्व काही अचूक असावे म्हणजे पीर मुहम्मदची भूमिका अगदी अस्सल साकारता येईल, असे त्याचे मत आहे. यासंदर्भात त्याला विचारले असता तो म्हणाला, “मी हिंदी टीव्ही मालिकांमध्ये तब्बल चार वर्षांनी भूमिका साकारीत आहे, त्यामुळे मी सर्व तपशिलाची गोष्टींची बारकाईने तपासणी करतो आहे. माझ्या भूमिकेबद्दल मी खूप आग्रही असून माझं पुनरागमन अचूक आणि प्रभावी झालं पाहिजे, यावर माझा कटाक्ष आहे. त्यामुळे माझ्या हातातील गोष्टींकडे मी विशेष लक्ष देत आहे.”'क्योंकी साँस भी कभी बहु थी' या लोकप्रिय मालिकेत अंश या भूमिकेव्दारे घराघरात पोहचला. या मालिकेनंतर वेगवेगळ्या शोमधून तो छोट्या पडद्यावर झळकत राहिला. कुसुम, कुछ इस तरह,कहानी हमारे महाभारत की,तसे फिअर फॅक्टर,झलक दिखला जा 1पर्व,कॉमेडी सर्कसचे 2 पर्व तसेच 2011मध्ये तो बिग बॉसच्या 5व्या पर्वातही झळकला होता. आकाशदीपप्रमाणेच याच मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहा वाघनेही दीड वर्षानी छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. 'एक वीर की अरदास: वीरा' या मालिकेत स्नेहा आईच्या भूमिकेत झळकली होती.‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या मालिकेत स्नेहा महाराजा रणजितसिंग यांच्या आईच्या भूमिका साकारत आहे.