‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 15:10 IST2018-08-14T14:54:58+5:302018-08-14T15:10:19+5:30
कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर आहे हरहुन्नरी. मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमधील हरहुन्नरी लक्ष्मी !
कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर आहे हरहुन्नरी. मालिकेमधील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अभिनयाबरोबरच समृद्धीला नृत्याची देखील आवड आहे. म्हणूनच समृद्धी लहानपणापासून कथ्थकचे शिक्षण घेत आहे. ठाण्यामधील नुपूर नृत्यालयच्या संचालिका नृत्यालंकार सौ. निवेदिता रानडे यांच्याकडून नृत्याचे धडे तिने गिरवले. यावर्षी समृद्धी विशारद पूर्णच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली. सध्या समृद्धी शूटींग सांभाळून तिची ही आवड देखील उत्तमरीत्या जोपासत आहे असं म्हणायला हरकत नाही. कथ्थक बरोबरच समृद्धी लावणी, हिप हॉप, बॉलीवूड, वेस्टर्न याप्रकारचे नृत्य देखील लीना भोसले शेलार यांच्याकडून शिकत आहे, यांचे क्लास देखील ठाण्यामध्ये आहेत.
यावर बोलताना समृद्धी म्हणाली,“माझी नृत्याची आवड बघून आईने मला लहानपणीचं कथ्थक शिकण्यासाठी सौ. निवेदिता रानडे यांचे क्लासेस सुरु केले. गेल्या १३-१४ वर्षांपासून किंबहुना त्याहून जास्त वर्षांपासून मी कथ्थक शिकत आहे. मी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातर्फे कथ्थकच्या परीक्षा देत होते. यावर्षी मी विशारद पूर्ण झाले ते पण Distinction मध्ये याचा मला आनंद आहे. कथ्थकच्या परीक्षा खूप कठीण असतात, जवळपास सहा तास या परीक्षा सुरु असतात. कथ्थक शिकण्याचा उपयोग आज मला लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमध्ये अभिनय करताना देखील होत आहे”.