चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:06 IST2024-09-20T13:06:06+5:302024-09-20T13:06:50+5:30

अभिजीतला आज टास्कदरम्यान महिला सदस्यांनी साडी नेसवून तयार केलं. अभिजीतचा हा भन्नाट लूक पाहून सर्वच घायाळ झाले (bigg boss marathi 5, abhijeet sawant)

abhijeet sawant carry women look wear saree and lipstick video viral from bigg boss marathi 5 | चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

बिग बॉस मराठीमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही. एकाक्षणी एकमेकांशी वाद करणारे सदस्य एकमेकांशी कधी चांगलं वागतील काही सांगता येत नाही. आज बिग बॉस मराठीमध्ये असंच खेळीमेळीचं वातावरण बघायला मिळणार आहे. आज वर्षा, धनंजय, अरबाज आणि सूरज या चौघांपैकी कोण कॅप्टन होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच आज बिग बॉसच्या घरात गायक अभिजीत सावंतला चक्क साडी नेसवण्यात आलीय.

अभिजीतला नेसवली साडी, निक्की म्हणाली...

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागाचा प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोमध्ये बघायला मिळतं की, आजच्या स्पेशल टास्कमध्ये अभिजीतला साडी नेसवण्यात येणार आहे. घरातील सर्व महिला अभिजीतला एका खुर्चीवर बसवत त्याला साडी नेसवताना दिसत आहेत. अभिजीतचा महिलांनी मेकअप केला असून निक्कीने त्याच्यासाठी मोठे केस आणले. इतकंच नव्हे तर अभिजीतला लिपस्टिक लावण्यात आली. अभिजीतचा लूक बघून निक्की तिच्या खास अंदाजात बाsssई असं म्हणाली. 


साडी नेसवताच अभिजीत काय म्हणाला?

अभिजीतला साडी नेसवताना सर्व पाहत होते. इतक्यात सूरज म्हणाला, "बायो, कसली दिसते गं" हे ऐकताच अभिजीतसोबत सर्वच हसायला लागले.  पुढे अभिजीत म्हणाला, "काय रे माझ्यावर हे दिवस आलेत. पोरी बघतील ना तेव्हा बोलतील बापाचं काय झालंय हे." अभिजीत हे बोलताच वर्षाताई आणि पॅडी हसायला लागले. पुढे साडी नेसवल्यावर अभिजीतने महिलांसारख्या अदाही केल्या. एकूणच अभिजीत साडीत खूप सुंदर दिसत होता, हे नक्की. 

Web Title: abhijeet sawant carry women look wear saree and lipstick video viral from bigg boss marathi 5