अभिजीत सावंतकडून चाहत्यांना गूड न्यूज, इन्स्टा पोस्ट करत दिलं गोड सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:13 IST2025-04-30T12:01:16+5:302025-04-30T12:13:32+5:30

अभिजीत सावंतच्या गोड बातमीनंतर त्याचे खूश झाले आहेत. 

Abhijeet Sawant Announces New Version Of ‘chaal Turu Turu’ Song, Releasing On May 2 | अभिजीत सावंतकडून चाहत्यांना गूड न्यूज, इन्स्टा पोस्ट करत दिलं गोड सरप्राईज

अभिजीत सावंतकडून चाहत्यांना गूड न्यूज, इन्स्टा पोस्ट करत दिलं गोड सरप्राईज

सुप्रसिद्ध मराठमोळा गायक अभिजीत सावंत त्याच्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अभिजीत नेहमी त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत राहिलेला आहे. अभिजीतच्या गाण्याचे अनेकांना वेड आहे. इंडियन आयडलच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरलेला अभिजीत सावंत गेल्यावर्षी 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा अभिजीत सावंत पहिला रनअप ठरला होता. अभिजीतला महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिलं. आता अभिजीत सावंतने चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे.

अभिजीत हा 'बिग बॉस'नंतर 'सेलिब्रिटी मास्टर शेफ' (Celebrity Master Chef ) या कार्यक्रमात दिसला होता. आपल्या कुकिंगने प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न त्यानं केलं होता. आता त्यानंतर अभिजीत चाहत्यांसाठी खास सरप्राईज घेऊन आला आहे.  अभिजीत एक खास गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यानं सोशल मीडियावरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 


अभिजीत हा 'चाल तुरु तुरु' या जुन्या गाण्याचं खास नवं व्हर्जन करणार आहे. येत्या २ मे २०१५ रोजी हे गाणं रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर अभिजीत सावंत कमालीचा सक्रीय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यबाबत तो याद्वारे चाहत्यांना अपडेट्स देतो.   'बिग बॉस'मधून बाहेर येताच त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. त्यामुळे अभिजीतबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना उत्सुक असतात. आता अभिजितचं हे नवं गाणं ऐकण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
 

Web Title: Abhijeet Sawant Announces New Version Of ‘chaal Turu Turu’ Song, Releasing On May 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.