अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:26 IST2024-10-05T18:25:12+5:302024-10-05T18:26:26+5:30

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो रिलीज झालाय. कोणाचा परफॉर्मन्स बघण्यासाठी जास्त उत्सुक आहात

abhijeet sawant and suraj chavan dance performane in bigg boss marathi 5 grand finale | अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

तर वाचकांनो, बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची ग्रँड फिनाले सुरु व्हायला आता २४ तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. या सीझनचा विजेता कोण होणार हे प्रेक्षकांना थोड्याच वेळात कळेल. अशातच बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत घरातील चर्चेतले स्पर्धक अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण  या दोघांचा धमाकेदार परफॉर्मन्स बघायला मिळतोय. ग्रँड फिनालेचा हा पहिलाच प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो आऊट

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनच्या ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोत सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंतचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पहिल्यांदा अभिजीत सावंत 'तौबा तौबा' या गाजलेल्या गाण्यावर स्टायलिश डान्स करताना दिसतो. तर दुसरीकडे सूरज चव्हाणची स्कूटरवर एन्ट्री होते. सूरज 'झापुकझुपुक' गाण्यावर डान्स करुन झोकात एन्ट्री घेतो. शेवटी दोघेही एकमेकांच्या समोर येऊन डान्स परफॉर्मन्स करताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेच्या पहिल्याच प्रोमोला चांगला प्रतिसाद मिळालेला दिसतोय.


ग्रँड फिनाले किती वाजता बघायला मिळणार?

उद्या रविवारी ६ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता, 'बिग बॉस मराठी'च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ६ ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी आणि धनंजय पोवार या सहा जणांमध्ये फायनलची चुरस बघायला मिळेल. 

Web Title: abhijeet sawant and suraj chavan dance performane in bigg boss marathi 5 grand finale