कंठ दाटून आला, तोंडून शब्द फुटेना! प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिजीत खांडकेकर भावुक,सर्वांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:32 IST2025-10-12T11:25:58+5:302025-10-12T11:32:15+5:30

कंठ दाटून आला, तोंडून शब्द फुटेना! प्रिया मराठेच्या आठवणीत अभिजीत खांडकेकर भावुक,सर्वांचे डोळे पाणावले

abhijeet khandkekar got emotional in memory of priya marathe in zee marathi awards everyones eyes were filled with tears video viral | कंठ दाटून आला, तोंडून शब्द फुटेना! प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिजीत खांडकेकर भावुक,सर्वांचे डोळे पाणावले

कंठ दाटून आला, तोंडून शब्द फुटेना! प्रिया मराठेबद्दल बोलताना अभिजीत खांडकेकर भावुक,सर्वांचे डोळे पाणावले

Abhijeet Khandkekar Talk About Priya Marathe Journey : छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रिया मराठे आता या जगात नाही. गेल्या काही काळापासून प्रिया मराठे कर्करोगाने त्रस्त होती. अखेर या जीवघेण्या आजाराशी तिची झुंज अपयशी ठरली आणि ३१ ऑगस्ट रोजी तिचं निधन झालं. प्रिया केवळ ३८ वर्षांची होती तिच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. 


प्रिया मराठे तिच्या अभिनयासह, सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली होती.  तिच्या जाण्यानं  मराठीसह हिंदी मनोरंजनविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर अनेकांनी तिच्याबरोबरच्या काही आठवणी शेअर केल्याच्या पाहायला मिळालं. अशातच यंदाच्या झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर प्रिया मराठेचा सहकलाकार, मित्र अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडेने प्रियाच्या आठवणी शेअर करत अनोख्या पद्धतीने या नायिकेला आदरांजली वाहिली. या दरम्यान, पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. 

झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिजीत खांडकेकर म्हणाला, आजचा हा सोहळा स्वप्नांचा आहे. सगळी स्वप्न सजतायतेत रंगातायत. पुरस्कार जाहीर होतायेत. याच  निष्ठेने एका हरहुन्नरी अभिनेत्रीने आपली प्रत्येक भूमिका जिवंत केली. मग ती नायिका असो किंवा खलनायिका...".याचदरम्यान व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, अभिजीतला प्रिया मराठेबद्दल बोलताना अश्रू अनावर होतात. 

त्यानंतर पुढे मृण्मयी देशपांडे म्हणते, "या सुखांनो या मालिकेतून झी मराठीवर पदार्पण केलं. त्यानंतर तू तिथे मी मधील प्रिया मोहिते या खलनायिकेची छाप पाडली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील गोदावरी प्रेक्षकांना भावली. येऊ कशी कशी मी नांदायला मधील बॉसही ओमकार स्विटूच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. पड्यावरच्या भूमिका रंगवत ती खऱ्या आयुष्यातली जवळची मैत्रीण झाली,आदर्श मुलगी आणि सदैव साथ देणारी बायको सुद्धा झाली. मी एवढंच सांगेन,प्रिया आजही आहे आपल्या स्मृतीत आहे. तिच्या कलाकृतींमध्ये आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे." त्यानंतर या पुरस्कार सोहळ्यातील प्रत्येकाकडून अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

Web Title : प्रिया मराठे को याद करते हुए अभिजीत खांडकेकर हुए भावुक, दर्शक हुए नम

Web Summary : एक पुरस्कार समारोह में प्रिया मराठे के सफर के बारे में बात करते हुए अभिजीत खांडकेकर भावुक हो गए। मृण्मयी देशपांडे ने अभिनेत्री को श्रद्धांजलि देते हुए यादें साझा कीं। एक नायिका और खलनायिका के रूप में उनकी भूमिकाओं को याद किया गया। पूरे दर्शकों ने अश्रुपूर्ण आंखों से श्रद्धांजलि अर्पित की।

Web Title : Abhijeet Khandkekar gets emotional remembering Priya Marathe; audience in tears.

Web Summary : Abhijeet Khandkekar became emotional while talking about Priya Marathe's journey at an award ceremony. Mrunmayee Deshpande shared memories, honoring the actress. Her roles as a protagonist and antagonist were remembered. The entire audience paid tribute with tearful eyes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.