"मला त्याचं जाणं सहन होत नाहीये", 'आई कुठे...'मधील आशुतोषच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 14:09 IST2024-03-28T14:08:45+5:302024-03-28T14:09:44+5:30

"मी स्वत: एक अभिनेता असूनही आशुतोषचं जाणं...", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मराठी अभिनेता भावुक

abhijeet kelkar gets emotional after aai kuthe kay karte aashutosh death commented on madhurani prabhulkar post | "मला त्याचं जाणं सहन होत नाहीये", 'आई कुठे...'मधील आशुतोषच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेता भावुक

"मला त्याचं जाणं सहन होत नाहीये", 'आई कुठे...'मधील आशुतोषच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेता भावुक

'आई कुठे काय करते' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायम अव्वल स्थानी होती. मध्यमवर्गीय देशमुख परिवाराची कथा आणि कुटुंबातील आई प्रेक्षकांना भावली. या मालिकेतील अरुंधतीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. तसंच तिच्या प्रत्येक सुख दु:खात तिला प्रेक्षकांचीही साथ मिळाली. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजताच पूर्णपणे कोसळलेल्या अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषच्या रुपाने एक नवी उमेद आली होती. पण, आता त्याचंही निधन झाल्याने अरुंधतीवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

स्टार प्रवाहवरील अतिशय लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' मालिकेतील हे वळण प्रेक्षकांना रुचलं नव्हतं. आशुतोषच्या जाण्याने देशमुख कुटुंबीय आणि प्रेक्षकांना धक्का बसला. तसंच आशुतोषचं जाणं एका मराठी अभिनेत्याच्याही जिव्हारी लागलं आहे. अभिनेता अभिजीत केळकरने त्याच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. आशुतोषने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अरुंधती हे पात्र साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आशुतोषला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर अभिजीत केळकरने कमेंट केली आहे. 

"मी स्वतः एक अभिनेता असूनही मला आशुतोषचं जाणं सहन होत नाहीये किंवा accept करता येणार नाहीये. आणि त्याही पलीकडे जाऊन...ह्यापुढे तुला त्याच्याशिवाय, तसं पाहणं...हे तुमच्यावरचं प्रेम म्हण, सवय म्हण किंवा आणखीन काही...but its killing indeed", अशी कमेंट अभिजीतने मधुराणीच्या पोस्टवर केली आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेत ओमकार गोवर्धन आशुतोष हे पात्र साकारत होता. त्याच्या मालिकेतील एन्ट्रीने चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. पण, आता त्याने मालिकेतून एक्झिट घेतल्याने प्रेक्षक नाराज आहेत. 

Web Title: abhijeet kelkar gets emotional after aai kuthe kay karte aashutosh death commented on madhurani prabhulkar post