आयुषी भावेची नवी हिंदी मालिका, '10:29 की आखरी दस्तक'मध्ये साकारणार बिंदूची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 18:35 IST2024-05-24T18:34:53+5:302024-05-24T18:35:15+5:30
Aayushi Bhave : आयुषी भावे लवकरच '10:29 की आखरी दस्तक' या मालिकेत बिंदूच्या भूमिकेत दिसणार आहे.

आयुषी भावेची नवी हिंदी मालिका, '10:29 की आखरी दस्तक'मध्ये साकारणार बिंदूची भूमिका
लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगणा आयुषी भावे (Aayushi Bhave) लवकरच स्टार भारत वाहिनीवरील आगामी मालिका '10:29 की आखरी दस्तक' मध्ये बिंदूची भूमिका साकारणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल उत्सुक असलेल्या आयुषी भावेने तिच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. या मालिकेत काम करण्यासाठी आयुषी खूप उत्सुक आहे.
आयुषी भावे म्हणाली, "मी '10:29 की आखरी दस्तक' या शोमध्ये बिंदूची भूमिका साकारत आहे आणि हे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या शोची कथा खूप मनोरंजक आहे, आणि हे पात्र मी साकारलेल्या इतर पात्रांपेक्षा खूप वेगळं आहे कारण बिंदू ही एक मनोरंजक स्त्री आहे, ती एक अतिशय जीवंत स्त्री आहे जी थोडी विचित्र आहे आणि प्रत्येक एपिसोडमुळे या कथेला नवीन पदर मिळतात आणि प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक असणार आहे जे त्यांना गुंतवून ठेवेल आणि पुढील कथा जाणून घेण्यासाठी ते उत्सुक असतील."
बिंदूचे पात्र हे मालिकेच्या कथेचे केंद्रबिंदू आहे, जे अनेक रहस्ये आणि ट्विस्ट आणि वळणांनी भरलेले आहे. कथा जसजशी उलगडत जाईल तसतसे प्रेक्षक तिच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वात ओढले जातील आणि '10:29 की आखरी दस्तक' शोमध्ये आणणारे रहस्य आणि उत्साह अनुभवतील.