आर्या जाधव परत येतेय! 'बिग बॉस'मध्ये निक्कीच्या कानाखाली मारली, पुन्हा तिलाच भिडणार अमरावतीची वाघीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:49 IST2026-01-25T12:48:05+5:302026-01-25T12:49:06+5:30

'या' शोमध्ये निक्की-अरबाजसोबतच आर्या जाधवचीही एन्ट्री

aarya jadhao to enter the 50 show after bigg boss marathi 5 also nikki tamboli will be in the show | आर्या जाधव परत येतेय! 'बिग बॉस'मध्ये निक्कीच्या कानाखाली मारली, पुन्हा तिलाच भिडणार अमरावतीची वाघीण

आर्या जाधव परत येतेय! 'बिग बॉस'मध्ये निक्कीच्या कानाखाली मारली, पुन्हा तिलाच भिडणार अमरावतीची वाघीण

बिग बॉस मराठी चं सहावं पर्व सुरु आहे. त्याआधी पाचव्या पर्वातही धमाल आली होती. निक्की तांबोळी, अरबाज पटेल, आर्या जाधव, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर अशा सदस्यांनी सीझन गाजवला होता. तसंच आर्या जाधवने निक्की तांबोळीला कानाखाली मारली होती.  यामुळे तिला घर सोडून जावं लागलं होतं. आता आर्या आणि निक्की पुन्हा आमने सामने येत आहेत. 'द ५०' हा रिएलिटी शो हॉटस्टारवर येतोय. या शोमध्ये ५० स्पर्धक सहभागी होणार आहेत त्यातच निक्की, अरबाज, आर्या, जान्हवी, शिव ठाकरे यांचीही नावं आहेत. 

आर्या जाधव ही अमरावतीची रॅपर मुलगी आहे. आपल्या मराठमोळ्या रॅपने तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. नंतर बिग बॉसमुळे ती आणखी चर्चेत आली होती. आर्याने इन्स्टाग्रामवर ती 'द ५०'शोमध्ये जात असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. तिने तिकीटासोबतचा फोटो शेअर केला आहे. आर्या आणि निक्की पुन्हा भिडताना दिसणार आहेत. आर्याला तिच्या या प्रवासासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 


'द ५०' शोमध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक चेहरे सहभागी होत आहेत. निक्की तांबोळी, आर्या जाधव. अरबाज पटेल, शिव ठाकरे आणि जान्हवी किल्लेकर या मराठमोळ्या चेहऱ्यांचा यात सहभाग आहे. तर हिंदीतील करण पटेल, रिद्धी डोगरा, उर्वशी ढोलकिया, फैजल शेख अशी काही नावं समोर आली आहेत. फराह खान या शोची होस्ट असणार आहे. सर्व स्पर्धक एकाच घरता राहणार असून त्यांच्यात अनेक खेळ रंगणार आहेत. शेवटपर्यंत कोण टिकून राहतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. १ फेब्रुवारी पासून शो जिओ हॉटस्टार आणि टेलिव्हिजनवरही प्रसारित होणार आहे. 

Web Title : 'द 50' में निक्की तंबोली का सामना करने के लिए आर्या जाधव की वापसी।

Web Summary : आर्या जाधव, जो बिग बॉस में निक्की तंबोली के साथ अपने विवाद के लिए जानी जाती हैं, रियलिटी शो 'द 50' में फिर से उसका सामना करने के लिए तैयार हैं। शो में कई अन्य मराठी और हिंदी टेलीविजन हस्तियां हैं। इसकी मेजबानी फराह खान करेंगी और 1 फरवरी से जियो हॉटस्टार पर प्रसारित होगी।

Web Title : Aarya Jadhav returns to face Nikki Tamboli in 'The 50'.

Web Summary : Aarya Jadhav, known for her Bigg Boss stint and conflict with Nikki Tamboli, is set to face her again in 'The 50' reality show. The show features other Marathi and Hindi television personalities. It will be hosted by Farah Khan and will air on Jio Hotstar from February 1st.