Aai kuthe kay karte: नादखुळा...! अरूंधती-आशुतोषच्या ड्यूएट गाण्यावर चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 15:04 IST2022-06-08T15:03:13+5:302022-06-08T15:04:29+5:30
Aai kuthe kay karte: होय, नुकतंच आशुतोष व अरूंधतीनं स्टुडिओत एकत्र गाणं रेकॉर्ड केलं. सोबतीस हलके सावलीस ऊन... भोवती तशीही मोरपीस खूण... अशा या गाण्यानं सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे.

Aai kuthe kay karte: नादखुळा...! अरूंधती-आशुतोषच्या ड्यूएट गाण्यावर चाहते फिदा
‘आई कुठे काय करते’ (Aai kuthe kay karte) ही सध्याची आघाडीची मालिका. या मराठी मालिकेनं प्रेक्षकांना जणू वेड लावलं आहे. उत्तम कथानक, तितकेच उत्तम कलाकार आणि तितकाच उत्तम अभिनय असलेल्या या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. सध्या मात्र चर्चा आहे ती अरूंधती व आशुतोषच्या गाण्याची. होय, नुकतंच आशुतोष व अरूंधतीनं स्टुडिओत एकत्र गाणं रेकॉर्ड केलं. सोबतीस हलके सावलीस ऊन... भोवती तशीही मोरपीस खूण... अशा या गाण्यानं सध्या सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे.
होय, मालिकेतील अरूंधती व आशुतोषचं हे ड्यूएट सॉन्ग चाहत्यांना भलतंच आवडलं आहे. मालिकेत अरूंधती व आशुतोष हे गाणं गाताना दिसत असले तरी प्रत्यक्षात मंदार आपटे आणि विद्या करलगिकर यांनी हे गाणं गायलं आहे. निलेश मोहरीर यांनी या गाण्याला संगीत दिलं असून श्रीपाद जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. अरूंधती अर्थात मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिनेही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे आणि या गाण्यावर चाहत्यांच्या कमेंट्सचा नुसता पाऊस पडतोय. सुंदर, अप्रतिम, मस्त, तुफान, लय भारी अशा कमेंट्स करताना चाहते थकत नाहीयेत. काहींनी मधुराणीच्या ओरिजनल आवाजातील एखादं गाणं ऐकायला आवडेल, अशी इच्छाही यानिमित्तानं व्यक्त केली आहे.
याआधी याच मालिकेत अरूंधतील ‘सुखाचे चांदणे’ हे गाणं रेकॉर्ड करताना दिसली होती. यानिमित्तानं पहिल्यांदाच एका मालिकेसाठी खास गाणं तयार केल्याचं पाहायला मिळालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता ‘सोबतीस हलके’ या गाण्यालाही प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळतोय.
मालिकेतील कथानकानुसार, काही दिवसांपूर्वीच अरुंधतीला एका सिनेमाच्या गाण्याची ऑफर मिळाली. तिच्यासोबतच आशुतोषलादेखील या सिनेमात गाण्याची संधी मिळाली. त्यामुळे या जोडीनं एकत्रपणे सोबतीस हलके या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. या गाण्याच्या अनुषंगाने मालिकेत कोणतं नवं वळण येतं, यासाठी मात्र तुम्हाला मालिका पाहावी लागणार आहे.