'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या बकेट लिस्टमधील ती इच्छा होणार पूर्ण, जाणून घ्या याबाबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 18:00 IST2022-06-18T17:56:27+5:302022-06-18T18:00:15+5:30
Aai Kuthe Kay Karte Serial : देशमुखांच्या कुटुंबात असताना सतत दुसऱ्यांचा विचार करणारी, भित्रट अरुंधती आता नव्याने प्रेक्षकांसमोर येत आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या बकेट लिस्टमधील ती इच्छा होणार पूर्ण, जाणून घ्या याबाबत
'आई कुठे काय करते' ( aai kuthe kay akrte) या मालिकेतील अरुंधतीचं दिवसेंदिवस नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. देशमुखांच्या कुटुंबात असताना सतत दुसऱ्यांचा विचार करणारी, भित्रट अरुंधती आता नव्याने प्रेक्षकांसमोर येत आहे. अनिरुद्धने घटस्फोट दिल्यानंतर अरुंधती केवळ तिच्या पायावर उभी राहिली नाही. तर, तिने तिची स्वप्न पूर्ण करायला घेतली आहेत. लवकरच तिच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण होणार आहे.
सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात अरुंधतीला कामा निमित्त मुंबई ते इंदोर फ्लाइटनी एकटीने प्रवास करणार आहे. अरुंधतीला एकटीने जाण्याचे दडपण आलं आहे.
आशुतोष अरुंधीतला जाशील नक्की ना त्याप्रमाणे तुझं उद्या सकाळं फ्लाइटचं तिकिटं काढतो. जावर अरुंधती जाईन मी असे त्याला उत्तर देतो. अरुंधतीचा चेहरा पाहून अप्पा तिला विचारतात काय झालं अरु, यावर ती सांगते मला कामानिमित्त एकटी्ने मुंबई बाहेर जायचंय. हे ऐकून आप्पा खुश होतात आणि तिला नक्की जाण्याचा सल्ला देतात. तर अनघा तिला म्हणते आता असे प्रसंग येत राहणार आणि तू ते सहज जमवशील. प्रत्येक प्रवासात आपण काहीतरी शिकत असतो. आता अरुंधती एकटीने विमानाने प्रवास करणार का?, तिच्या बकेट लिस्टमधील ही इच्छा पूर्ण होणार का?, या प्रश्नाची उत्तर आपल्याला लवकरच मालिकेतून मिळतील.