आता खऱ्या अर्थाने होणार अरुंधतीची प्रगती, आता तिला मिळालीय सगळ्यात मोठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 19:05 IST2022-03-30T19:01:28+5:302022-03-30T19:05:48+5:30
अरुंधती स्वबळावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना वारंवार तिचा पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे.

आता खऱ्या अर्थाने होणार अरुंधतीची प्रगती, आता तिला मिळालीय सगळ्यात मोठी ऑफर
'आई कुठे काय करते' या मालिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून देशमुखांच्या कुटुंबात कोणती ना कोणती घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधती स्वबळावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना वारंवार तिचा पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. अरुंधतीला एक मोठी ऑफर मिळणार आहे. हे पाहून आता अनिरुद्ध आणि संजनाचा जास्त जळफळाट होणार आहे.
सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतोय, या प्रोमोमध्ये संगीतकार निलेश मोहिर अरुंधतीला सिनेमात गाण्याची ऑफर देताना दिसतोय. यावर अरुंधतीचा काहीवेळ विश्वास बसत नाही.
''मी एक फिल्म करतोय आणि त्यातील सगळी गाणी मीच कपॉझ करतोय आणि मला खूप आवडेल त्यातलं एक गाणं तुम्ही गायलात तर यावर अरुंधती म्हणते मी आणि फिल्मसाठी.. यावर निलेश अरुंधतीला सांगतो, हो तुमच्या आवाजाला एकमद सुट आहे गाणं. यावर आशुतोष म्हणतो निलेश म्हणतो म्हणजे करेक्ट असेल. निलेश अरुंधती नक्की गायील..''
अरुंधती निलेशची ऑफर खरचं स्वीकारणार का?, समोरुन चालून आलेल्या संधीचं अरुंधती सोनं करणार का ?, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.