आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक वळण, आप्पा अनिरुद्धच्या मारणार कानाखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 11:55 IST2022-06-25T11:40:45+5:302022-06-25T11:55:54+5:30
Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध सातत्याने अरुंधतीच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आप्पा यावेळी अनिरुद्धला पकडणार रंगेहाथ, सगळ्यांनासमोर त्याच्या कानाखाली मारणार आहेत.

आई कुठे काय करते मालिकेत धक्कादायक वळण, आप्पा अनिरुद्धच्या मारणार कानाखाली
आई कुठे काय करते या मालिकेने उत्तम कथानक आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका टीआरपी आणि लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. अनिरुद्धपासून विभक्त झालेली अरुंधती सुखाने तिचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, अरुंधतीला नात्यातून मोकळं केल्यानंतरही अनिरुद्ध तिची पाठ सोडायला तयार नाही. तो सातत्याने तिच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा अनिरुद्ध अरुंधतीच्या घरात शिरला आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध अरुंधतीच्या घरातून बाहेर पडताना त्याला आप्पा रंगेहाथ पकडतात. आप्पा, यश आणि संजनाला समोर बघून अनिरुद्धच्या चेहऱ्यावर रंगच उडून जातो. अनिरुद्ध काही बोलण्याच्या आधीच आप्पा त्याच्या कानाखाली मारतात.
अरुंधती घरात नसताना तो घरात का शिरल्यास याबाबत आप्पा अनिरुद्धला जाब विचारतात. काय झालंय अनिरुद्ध तुझं, काय करतोस तू, इतक्या खालच्या पातळीला जाशील? का आला होतास तू इथं, काय काम होतं तुझं, अरुंधती नसताना तू इथं का आलास? काय काम होतं तुझं. काय शोधत होतास तू? अशा शब्दांत आप्पा अनिरुद्धला जाब विचारतात. अनिरुद्ध नेमका अरुंधतीच्या घरात काय शोधत होता?, अरुंधतीला हे कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असणार या सगळ्यावर हे आपल्याला लवकरच कळेल.