Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा रॉकिंग अंदाज; कल्पनाही केली नसेल अशा रुपात आली प्रेक्षकांसमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 07:00 IST2022-02-05T07:00:00+5:302022-02-05T07:00:00+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar)चा लेटेस्ट फोटोच नाही तर कॅप्शनही आलं चर्चेत

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीचा रॉकिंग अंदाज; कल्पनाही केली नसेल अशा रुपात आली प्रेक्षकांसमोर
छोट्या पडद्यावरील मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत आशुतोष या पात्राची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेत ट्विस्ट आला आहे. सध्या मालिकेत अरूंधतीच्या स्वप्नांना नवीन भरारी मिळणार आहे. या मालिकेत अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. दरम्यान मधुराणीचा सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे. फक्त फोटोच नाही तर तिच्या कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अरुंधती उर्फ मधुराणी गोखले हिने सोशल मीडियावर डेनिम जॅकेटमधील फोटो शेअर करत लिहिले की, अंतर्मनातील आनंदाला फिल्टरची गरज नसते. या फोटोत मधुराणी हसताना आणि पाउट करताना दिसते आहे. मधुराणीच्या या फोटोला आणि कॅप्शनला खूप पसंती मिळते आहे.
आशुतोष संजनावर भडकतो
मालिकेत अरुंधतीने तिच्या पहिल्या अल्बमचे रेकॉर्डिंग केले आहे आणि तसेच तिचे आणि आशुतोषचे पेपरात नावदेखील छापून आले आहे. हे पाहून अनिरूद्धचा जळफळाट होतो आणि त्याचा पारा चढतो. तर दुसरीकडे आशुतोष मिटींगमध्ये अरूंधतीच्या प्रसिद्धीचे प्लानिंग संजनासोबत करत असतो. तेव्हा संजना अरुंधतीला प्रसिद्धीची गरज नाही असे बोलते. त्यावर आशुतोष तिच्यावर खूप भडकतो आणि तिला खरीखोटी सुनावतो. तो तिला म्हणतो की, जे अरुंधतीला येते ते तुला आणि मला जमणार नाही. त्यामुळे अरुंधतीचा नवीन अल्बम कधी भेटीला येणार आणि त्यानंतर काय काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.