Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:44 AM2022-06-29T11:44:48+5:302022-06-29T11:45:40+5:30

Aai kuthe kay karte: पिकनिकमध्ये इशाला पाहून नीलला ती आवडली होती. त्यामुळे तिच्याशी मैत्री करत या मैत्रीचा फायदा तो घेतो.

aai kuthe kay karte nile missbehavin with isha video viral | Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण

Video: नील करणार इशाचा विनयभंग; बहिणीला वाचवण्यासाठी यश करणार नीलला मारहाण

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी देशमुखांच्या घरात आनंदाचे क्षण येतात तर काही वेळा सतत भांडणतंडे होत असल्याचं दिसून येतं. यामध्येच आता घरातील रोजच्या वातावरणापासून दूर इशा, यश आणि गौरी त्यांच्या मित्रांसोबत फिरायला गेले आहेत. मात्र, या पिकनिकमध्ये त्यांचा मित्र नील इशावर जबरदस्ती करतो. त्यामुळे संतापलेला यश त्याला मारझोड करतो.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नील इशावर जबरदस्ती करताना दिसत आहे. या घटनेची माहिती यशला मिळताच तो घटनास्थळावर पोहोचतो आणि इशाला वाचवतो. इतकंच नाही तर तो नीलच्या डोक्यावर काठीने आघात करतो ज्यामुळे नील जखमी होतो.

दरम्यान,  पिकनिकमध्ये इशाला पाहून नीलला ती आवडली होती. त्यामुळे त्याने तिच्याशी मैत्री केली. मात्र, या मैत्रीचा फायदा घेतो. रात्रीच्या अंधारात फोटो काढायचं आमिष दाखवून तो तिला एकांतात घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करायला लागला. मात्र,  योग्यवेळी यश पोहोचल्यामुळे इशाची नीलच्या तावडीतून सुटका झाली. परंतु, इशाला सोडवण्याच्या नादात यशने नीलच्या डोक्यावर जोरात प्रहार केला आहे. त्यामुळे बेशुद्ध झालेला नील शुद्धीवर येईल का? त्याचा जीव धोक्यात तर नाहीये ना? या मालिकेत आता पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: aai kuthe kay karte nile missbehavin with isha video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.