'ते निघून गेल्यानंतर, त्यांच्या आठवणी..'; 'त्याच्या'साठी मिलिंद गवळींनी शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 05:50 PM2023-04-17T17:50:44+5:302023-04-17T17:51:28+5:30

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी या पोस्टमधून त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीविषयी भाष्य केलं आहे.

aai kuthe kay karte milind gawali share post about dogs love | 'ते निघून गेल्यानंतर, त्यांच्या आठवणी..'; 'त्याच्या'साठी मिलिंद गवळींनी शेअर केली भावूक पोस्ट

'ते निघून गेल्यानंतर, त्यांच्या आठवणी..'; 'त्याच्या'साठी मिलिंद गवळींनी शेअर केली भावूक पोस्ट

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (milind gawali). 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून ते प्रकाशझोतात आले. या मालिकेत त्यांनी साकारलेली अनिरुद्ध ही भूमिका ग्रे शेडची असली तरीदेखील त्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मिलिंद गवळी कलाविश्वासह सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय आहेत. त्यामुळे  बरेचदा ते नवनवीन पोस्ट शेअर करत त्यांच्या जीवनातील किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 

मिलिंद गवळी प्राणीप्रेमी असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. अनेकदा त्यांच्या पोस्टवरुन हे लक्षातही येतं. अलिकडेच त्यांनी त्यांच्या पाळीव श्वानाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

"Missing You “Dog is man’s best companion” आणि हे आजचं नाही तर कालांतरापासून कुत्रा हा माणसाच्या सगळ्यात जवळ असलेला प्राणी. मला कुत्र्याची लहानपणापासून आवड होती, पण कुत्रा पाळायची जबाबदारी मात्र घ्यायची हिंमत कधी झाली नाही, मी लहान असताना कुत्र चावला की पोटामध्ये 14 इंजेक्शन घ्यावी लागायची. माझा मावस भाऊ प्रशांत हा एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला घरी राहायला आला होता, आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये डिक्की नावाचा कुत्रा त्याला चावला, रोज एक, असे 14 दिवस, त्याच्या बेंबीच्या आजूबाजूला पोटामध्ये डॉक्टर त्याला कुत्रा चावल्याचे इंजेक्शन द्यायचे, मीच जात होतो त्याच्याबरोबर दवाखान्यात, त्यामुळे कुत्रा हा चावतो आणि त्याची भीती मनामध्ये बसली होती. पण नंतर वोडाफोनच्या जाहिरातीमध्ये तो पघ pug फार गोंडस आणि छान कुत्रा वाटायचा, तेव्हाच ठरवून टाकलं होतं की आपण पघpug हाच कूत्रा पाळायचा, माझी आई गेल्यानंतर घरचं वातावरण एकदम भकास झालं होतं, लेक मिथिला लहान होती. मग तिच्या वाढदिवसाला दिल्लीवरून माझ्या मित्रांनी एक पघ पाठवला, मिथिला सोडली तर घरचे काही फार खुश झाले नव्हते, तसा कोणी विरोधी केला नाही, ते पिल्लू होतं, गोंडस आणि लागवी होतं,त्याचं नाव मीच ठरवलं “हॅप्पी”, असं मिलिंद म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "आणि तसाच तो होता “हॅपी गो लक्की घरच्या सगळ्यांना त्यांनी जीव लावलाच पण अख्या बिल्डिंगच्या लहान मुलांचा लाडका झाला होता, संध्याकाळी सहा वाजता दररोज बिल्डिंग मधले दहा-बारा मुलं हॅपी बरोबर खेळायला यायची. त्याला पण त्यांची सवय झाली होती. म्हणता म्हणता बारा वर्षे कशी निघून गेली कळलच नाही, Happy कधी म्हातारा झाला कळलंच नाही, पृथ्वीवर आम्हाला भेट देण्यासाठी ज्या ग्रहावरून आला होता. त्या परग्रहावर असंख्य गोड आठवणी मागे ठेवून तो निघून गेला, ज्या ज्या वेळेला एकटं वाटायला लागतं, lonely feel होतं, त्यावेळेला त्याची खुप आठवण येते, निस्वार्थ प्रेम काय असतं ते या प्रेमळ प्राण्याकडनं शिकायला हवं, न कंटाळता न थकता जो प्रेम देईल त्याच्यावर दहापट प्रेमाची बरसात करत सुटायचं, खास हॅपीला भेटण्यासाठी आमच्याकडे खूप लोक यायची, आशालता बापगावकर त्यातल्या एक होत्या, त्या आणि हॅपी इतके खेळायचे की बघून आम्ही थक्क व्हायचो. कोण कोणावर जास्त प्रेम करतो याची चढाओढ लागायची."

''आज-काल असंख्य वेळेला मी छान छान कुत्र्यांना भेटत असतो, पण आता एखाद्याला घरी घेऊन येयची हिंमत होत नाही, कारण ते इतका जीव लावतात, की मग ते निघून गेल्यानंतर, त्यांच्या आठवणी फार त्रास देत असतात". दरम्यान, मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी यांनी मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. सिनेमा, नाटक, मालिका असं सर्वत्र त्यांचा वावर असल्याचं पाहायला मिळतो.
 

Web Title: aai kuthe kay karte milind gawali share post about dogs love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.