Video: कांचनने हात जोडून मागितली आप्पांची माफी; संजनाचं सत्यही केलं उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 19:30 IST2022-04-15T19:30:00+5:302022-04-15T19:30:02+5:30
Aai kuthe kay karte: आप्पांचा अपमान करणं, अरुंधतीवर नको नको ते आरोप करणं हे सगळं संजनाच्या सांगण्यावरुन केल्याचं कांचन सांगते.

Video: कांचनने हात जोडून मागितली आप्पांची माफी; संजनाचं सत्यही केलं उघड
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या देशमुख कुटुंबात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. कांचनच्या बोलण्यामुळे दुखावलेले आप्पा घर सोडून निघून गेले होते. या काळात ते अरुंधतीच्या घरी राहात होते. मात्र, अनिरुद्धला सत्य परिस्थिती समजल्यानंतर तो आईला खडे बोल सुनावतो आणि आप्पांची माफी मागून त्यांना घरी घेऊन ये असं बजावतो. अनिरुद्धचा राग पाहून कांचनला तिची चूक उमगते आणि ती आप्पांची माफी मागते. इतकंच नाही तर ती संजनाने कसं आपल्याला भडकवलं हेदेखील सांगते.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आप्पा पुन्हा देशमुखांच्या घरी आले आहेत. मात्र, त्यांनी कांचनची कायमचा अबोला धरला आहे. त्यामुळे कांचनने अनेक मिन्नतवाऱ्या केल्यानंतरही त्यांचा राग कमी होत नसल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आपण रागाच्या भरात हे सगळं का बोललो ते कांचन घरातल्यांसमोर सांगते.
दरम्यान, आप्पांचा अपमान करणं, अरुंधतीवर नको नको ते आरोप करणं हे सगळं संजनाच्या सांगण्यावरुन केल्याचं कांचन सांगते. संजनाने माझ्या मनात अनेक गोष्टींविषयी शंका निर्माण केली. त्यांमुळे रागाच्या भरात मी हे सगळं बोलले असं कांचन म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर संजना आणि कांचनमध्ये नव्याने वाद होतो. तर, संजनाची चूकही अनिरुद्धच्या लक्षात येते. मात्र, या सगळ्यात अद्यापही आप्पा कांचनला माफ करण्यास तयार नाहीत. त्यामुळे या मालिकेत पुढे काय होतं? आप्पा-कांचनमधील मतभेद मिटतात का? संजनाची चूक समजल्यानंतर अनिरुद्ध तिला शिक्षा देतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.