Aai Kuthe Kay Karte : डान्स आणि गाण्यांनी रंगला ईशा आणि अनिषचा साखरपुडा सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 17:59 IST2023-05-15T17:59:24+5:302023-05-15T17:59:50+5:30
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होतो आहे.

Aai Kuthe Kay Karte : डान्स आणि गाण्यांनी रंगला ईशा आणि अनिषचा साखरपुडा सोहळा
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या या मालिकेत सध्या ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्या सोहळा सुरु आहे. ईशा अनिष यांचा साखरपुडा देशमुखांच्या घरीच पार पडत आहेत. डान्स आणि गाण्यांनी ईशा आणि अनिषचा साखरपुड्याचा सोहळा रंगणार आहे. नुकताच 'आई कुठे काय करते'चा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये यश हा ईशाचं कौतुक करताना दिसत आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसते की, ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात यश हा ईशाबाबत बोलत आहे. यश हा ईशाचे कौतुक करतो. त्यामुळे ईशा भावूक होते. यश ईशाचा स्वभाव आणि ईशाचे प्रेम या सर्व गोष्टींबाबत अनिषला सांगतो. ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्यात अनिरुद्ध, अरुंधती आणि देशमुख कुटुंबाने डान्स केला.
'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी ईशा आणि अनिष यांच्या साखरपुड्यावरुन वाद झाला होता. ईशा आणि अनिशचा साखरपूडा हा घरच्या घरीच व्हावा, असं अरुंधतीचं मत होतं. तर दुसरीकडे ईशाचं म्हणणं होते की, तिला साखपुडा हा धुमधडाक्यात करायचा आहे. यावरून आणि अरुंधतीमध्ये वाद झाला होता. आता ईशा आणि अनिष यांचा साखरपुडा देशमुखांचा घरीच होत आहे. ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी ईशा, अनिशची आई, कांचनताई, सुलेखाताई आणि अरुंधती या सगळ्या एका साडीच्या दुकानात गेल्या होत्या. या दुकानात ईशाला एक घागरा आवडतो. या घागऱ्याची किंमत ३५ हजार आहे. हे ऐकून कांचनताई आणि अरुंधती आश्चर्यचकित होतात. पण तो घागरा ईशा खरेदी करते.