Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या आईला आणि बहिणीला पाहिलंत का?, बहिण दिसते तिच्या इतकीच सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:43 IST2023-03-06T16:43:04+5:302023-03-06T16:43:24+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या रिलच नाही तर रिअल लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे.

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या आईला आणि बहिणीला पाहिलंत का?, बहिण दिसते तिच्या इतकीच सुंदर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका कौटुंबिक नात्यावर भाष्य करते. या मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली. /या मालिकेच्या कथानकालाच नाही तर त्यातील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय. मात्र या मालिकेतील मुख्य आणि महत्त्वाचे पात्र म्हणजे अरुंधतीने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. अरुंधतीच्या रिलच नाही तर रिअल लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणीच्या नवऱ्या आणि लेकीबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणदेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.
मधुराणी प्रभुलकरने नुकताच फॅमिलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिची लेक, आई, बहिण आणि बहिणीची मुलगी पाहायला मिळत आहे. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
मधुराणीच्या धाकट्या बहिणीचं नाव आहे अमृता गोखले-सहस्रबुद्धे (Amruta Gokhale-Sahastrabuddhe). अमृता ही गायिका असून तिने झी मराठी वाहिनीवरील सारेगमपा शोच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला होता. इतकेच नाही तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती.
याशिवाय अमृताचे स्वतःचे युट्यूब चॅनेल असून त्यावर बरीच कव्हर साँग्स ऐकायला मिळतील. अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. अमृताच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर तिचे आणि मधुराणीचे बरेच फोटो पाहायला मिळत आहेत.
मधुराणी प्रभुलकरला आई कुठे काय करते या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही ती पाहायला मिळाली आहे.