आता आम्ही सोबत नाही...! ‘आई कुठे काय करते’ फेम रूपाली भोसले पहिल्यांदाच ब्रेकअपवर बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:23 IST2022-01-20T15:23:37+5:302022-01-20T15:23:50+5:30
Rupali Bhosle breakup : अभिनेत्री रूपाली भोसले हिचे तिचा प्रियकर अंकित मगरेसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. आता खुद्द रूपालीने या चर्चांवर मौन सोडलं आहे.

आता आम्ही सोबत नाही...! ‘आई कुठे काय करते’ फेम रूपाली भोसले पहिल्यांदाच ब्रेकअपवर बोलली
मनोरंजन विश्वात ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चा नव्या नाहीत. अलीकडे मलायका अरोरा व अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. आता मराठी टेलिव्हिजन विश्वातही एका ब्रेकअपची चर्चा होतेय. होय,‘आई कुठे काय करते’ (Aai kuthe kay karte ) या मालिकेतील संजना अर्थात अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosle) हिचे तिचा प्रियकर अंकित मगरेसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. आता खुद्द रूपालीने या चर्चांवर मौन सोडलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रूपाली यावर बोलली.
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात रूपाली व अंकितचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू झाली होती. याबद्दल छेडलं असता, रूपालीने ब्रेकअप झाल्याचं मान्य केलं. ‘ऑक्टोबरआधीच आम्ही वेगळं झालोत. आम्ही दोघांनी सामंजस्यानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही सोबत नाहीत. पण मनात एकमेकांबद्दल कुठलीही कटुता नाही. आत्तापर्यंत आम्ही अधिकृतपणे यावर बोललो नव्हतो,’असं ती म्हणाली.
ब्रेकअपच्या कारणांचा खुलासा करताना ती म्हणाली, ‘काम आणि कुटुंबाची सुरक्षा याला मी प्राधान्य देते. त्याआड काही गोष्टी येणार असतील तर त्या तिथेच संपवणं योग्य आहे. सोशल मीडियावर काही लाईक्ससाठी नातं ताणण्यात काहीही अर्थ नाही. अंकित आणि मी आता संपर्कात नसलो तरी आमच्यातील संबंध सौहार्दपूर्ण असतील. मी त्याला शुभेच्छा देते. त्याने त्याचे ध्येय साध्य केल्यास मी नक्कीच त्याला फोन करून शुभेच्छा देईल. पण सध्या तरी आमच्यात अनावश्यक संभाषण नाही,’ असंही रूपालीने स्पष्ट केलं.
रूपालीला अलीकडेच कोरोनाची लागण झाली होती. पण आता ती बरी होऊन ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर परतली आहे. मात्र अद्यापही आपल्याला थकवा जाणवत असून कोरोनाची भीती वाटू लागली आहे, असंही ती म्हणाली.