"आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:12 PM2024-03-15T12:12:41+5:302024-03-15T12:13:24+5:30

'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोषचं पात्र ओमकार गोवर्धनने साकारलं आहे.  मालिकेतील त्याच्या पात्राच्या निधनामुळे ओमकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे. 

aai kuthe kay karte fame milind gawali shared special post for omkar gowardhan aka aashutosh | "आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

"आशुतोष मालिकेत नसणार याचा मला धक्का बसला आहे", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही अतिशय लोकप्रिय असेलली मालिका सध्या चर्चेत आहे. सुरुवातीपासून टीआरपीच्या शर्यतीत असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेतील अरुंधती आणि देशमुख कुटुंबीयांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. सध्या मालिकेत अनपेक्षित वळण आल्याचं दाखविण्यात आलं आहे. अरुंधतीचा दुसरा नवरा आशुतोषचं निधन झाल्याचं दाखविण्यात येणार आहे. 'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोषचं पात्र ओमकार गोवर्धनने साकारलं आहे.  मालिकेतील त्याच्या पात्राच्या निधनामुळे ओमकार मालिकेतून एक्झिट घेणार आहे. 

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीबरोबरच अनिरुद्ध ही भूमिकाही प्रचंड गाजली. अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आता मिलिंद गवळींनी ओमकार गोवर्धनसाठी पोस्ट लिहिली आहे. 

“ओमकार गोवर्धन” याने आशुतोष केळकर या भूमिकेची कात टाकली !

तीन साडेतीन वर्षांपूर्वी 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अरुंधती दुसरं लग्न करणार तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्युस होणार याची उत्सुकता होती. अचानक एक दिवस ओंकार गोवर्धन आणि माझी गाठ आमच्या 'आई कुठे काय करते'च्या सेटवर जिन्यामध्ये झाली. मी ओमकारला पाहिल्या पाहिल्या म्हटलं अरे आपण तर आधी भेटलो आहोत. गजेंद्र अहिरे यांनी मला एकदा त्याच्या सिनेमाच्या ट्रायल शोसाठी बोलावलं होतं. तो सिनेमा होता 'निळकंठ मास्तर'. त्या 'निळकंठ मास्तर'च्या भूमिकेमध्ये ओमकार गोवर्धन होता आणि मला त्याचं काम अतिशय आवडलं होतं. तोच मुलगा आता माझ्यासमोर आशुतोष केळकरच्या भूमिकेसाठी 'आई कुठे काय करते'मध्ये आला होता. मला त्याला बघून आनंद झाला. कारण, माझा नमितावर खूप विश्वास आहे. तिचं कास्टिंग कधी चुकत नाही. मी ओमकारला शुभेच्छा दिल्या आणि त्याला म्हटलं “व्वा! मजा येणार आता, मला खात्री आहे तू छानच काम करशील !"

...आणि अगदी तसंच झालं. ओमकारने इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या छान पद्धतीने आशुतोष केळकर ही भूमिका निभावली की तो सगळ्यांचा लाडका झाला ! मी आणि आप्पा ज्या मेकअप रूममध्ये होतो त्याच मेकअप रूममध्येच ओमकारची सोय करण्यात आली. आणि ओमकार आल्या दिवसापासून त्या मेकअप रूममध्ये फक्त कला मस्ती आणि हास्य रसाचा वर्षाव झाला. humour काय असतं हे ओमकारकडून शिकावं, सतत प्रसन्न राहणे, हसत राहणे आणि समोरच्याला हसवत राहणे हा त्याचा हातखंडा... पण, एकदा का स्क्रिप्ट हातात आली की ती पाठ करायची. त्याच्यावर म्हणून चिंतन करत राहायचं. डोक्यात जितके प्रश्न येतात ते Director ला विचारून त्याचं निरसन करायचं. एखाद्याचं वाक्य चुकलं, शब्द चुकला किंवा त्याचा अर्थ बदलला. तर प्रथम त्याला ते लक्षात यायचं. पाठांतराच्या बाबतीत त्याचा हात कोणीच धरू शकत नव्हतं. त्याची तर असंख्य सिनेमांची गाणी सुद्धा तोंड पाठ असायची. कधी कधी मेकअप रूम मध्ये आप्पा, अनीश आणि त्याच्या त्या गाण्यांच्या मैफिली व्हायच्या. बरेचदा मी पण त्यात सामील व्हायचो. 

आता आशुतोष केळकर मालिकेत नसणार याचा मला स्वतःलाच खूप मोठा धक्का बसला आहे. मला माहितीये मी त्याला खूप खूप miss करणार ! जसा लहानाचे एकत्र मोठे झालेले दोन भाऊ अचानक एक अमेरिकेला शिफ्ट व्हायला निघाला की त्या दुसऱ्या भावाची जी अवस्था होत असेल. तसंच काहीसं feeling आहे. पण त्याचं भाषेवरचं प्रभुत्व , त्याची अभिनयाची जाण , आणि त्याचं professionalism त्याला आयुष्यामध्ये अजून खूप मोठं करणार अशी माझी खात्री आहे! ओंकारला माझ्या खूप खूप शुभेच्छा...

दरम्यान, 'आई कुठे काय करते'मधील या ट्विस्टवर प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आशुतोषचं निधन झाल्याचं दाखविण्यात येणार असल्यामुळे मालिकेवर प्रेक्षक नाराज आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रसारण वेळेतही बदल करण्यात आला आहे. १८ मार्चपासून ही मालिका दुपारी २:३० वाजता स्टार प्रवाहवर दाखविण्यात येणार आहे. 

Web Title: aai kuthe kay karte fame milind gawali shared special post for omkar gowardhan aka aashutosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.