Milind Gawali : सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:20 AM2023-04-12T11:20:28+5:302023-04-12T17:30:33+5:30

Aai Kuthe Kay Karte, Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होतेय.

aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral | Milind Gawali : सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा

Milind Gawali : सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा

googlenewsNext

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी.मिलिंद गवळी (Milind Gawali) हे सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी, अनेक किस्से, दैनंदिन आयुष्यातील घडामोडी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांच्या भूमिकेचं ऑडिशन ते रिजेक्शनचा किस्सा सांगितला आहे.

पोस्टमध्ये ते लिहितात...

“मागच्या आठवड्यात कोणाचातरी फोन आला, ते म्हणाले एका चित्रपटासाठी श्री. माधवराव गोवलकर गुरुजींच्या भूमिकेसाठी तुम्ही ऑडिशन द्याल का, ऑडिशन म्हटलं की मी आधीच नाही म्हणून सांगतो, पण ऑडिशन कोणासाठी ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोविलकर गुरुजी यांच्या भूमिकेसाठी, (माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ . हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते. )

मी म्हटलं देतो ऑडिशन, ते म्हणाले getup वगैरे ची काही गरज नाही तुम्ही सेल्फ टेस्ट मोबाईलवर शूट करून पाठवा, पण मला तो गेटअप करावासा वाटला म्हणून मग मी आमचे मेकअप मन समीर म्हात्रे यांना म्हटलं सुट्टीच्या दिवशी आपण गुरुजींसारखा गेटअप करायचा प्रयत्न करूया.
सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आम्ही ती ऑडिशन शूटिंग संपवली, त्या कास्टिंगच्या गृहस्थाला तो व्हिडिओ पाठवून दिला, चार दिवसांनी त्याचा मेसेज आला की गुरुजींच्या भूमिकेसाठी तुमची निवड झाली नाही. Rejection हे माझ्यासाठी काही फार नवीन नाही आहे,आणि कलाकार म्हटलं की रिजेक्शन हा त्याच्या नशिबाला जडलेला प्रकार आहे. पण निदान चार तास का असेना अशी भूमिका जगायला मिळाली हे पण एक कलाकार म्हणून माझं भाग्यच आहे असे मी समजतो.
एका आयुष्यामध्ये इतके विविध आयुष्य जगायला मिळणं हे फक्त एका कलाकाराच्याच भाग्यात असतं. माझ्या भाग्यात होतं म्हणून “ आई कुठे काय करते “ मालिकेमधली अनिरुद्ध देशमुखची भूमिका अजूनही जगतो आहे. नाहीतर आयुष्यामध्ये कधी त्याच्यासारखं तिरसट वागता आलं असतं, किती कमी कलाकारांच्या वाटेला अशी , इतक्या विविध छटांनी भरलेली भूमिका येत असेल”, अशी पोस्ट मिलिंद गवळी यांनी केली आहे.

Web Title: aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.