"माझ्या होणाऱ्या मुलांची पणजी...", कांचन आजीसाठी 'आई कुठे...'च्या अनघाची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 04:59 PM2023-11-10T16:59:40+5:302023-11-10T17:17:58+5:30

'आई कुठे काय करते'मध्ये कांचन आजीची भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अश्विनीने अर्चना पाटकर यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. 

aai kuthe kay karte fame ashwini mahangade shared special post for archana patkar birthday | "माझ्या होणाऱ्या मुलांची पणजी...", कांचन आजीसाठी 'आई कुठे...'च्या अनघाची भावुक पोस्ट

"माझ्या होणाऱ्या मुलांची पणजी...", कांचन आजीसाठी 'आई कुठे...'च्या अनघाची भावुक पोस्ट

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणू अक्का ही भूमिका साकारलेली अभिनेत्री अश्विनी महागंडे सध्या 'आई कुठे काय करते'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती अनघा हे पात्र साकारत आहे. राणू अक्काप्रमाणेच अश्विनीची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अश्विनी आगामी प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबत पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. नुकतंच तिने कांचन आजीसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. 'आई कुठे काय करते'मध्ये कांचन आजीची भूमिका साकारणाऱ्या अर्चना पाटकर यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अश्विनीने अर्चना पाटकर यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. 

"आजी...On screen मला संसाराचे धडे देते, थोडी माझ्या निर्णयावर नाराज होते, चिडते, रुसून बसते. पण off screen माझी प्रचंड काळजी घेते, माझ्या सुखं दुःखात सोबत करते, 4 चांगल्या गोष्टी सांगते, रोज माझ्यासाठी घरून जेवण आणते आणि सगळ्यात महत्वाचे माझ्यावर खूप खूप प्रेम करते. माझ्या होणाऱ्या मुलांची #पणजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप प्रेम...", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. अजूनही ही मालिका तितकीच लोकप्रिय आहे. 

Web Title: aai kuthe kay karte fame ashwini mahangade shared special post for archana patkar birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.