'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची आई करते 'या' लोकप्रिय हिंदी मालिकेत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 07:00 IST2021-08-09T07:00:00+5:302021-08-09T07:00:00+5:30

आई कुठे काय करतेमधील अरुंधतीच्या आईची भूमिका मेधा जांबोटकर यांनी साकारली आहे.

'Aai Kuthe kay karte' fame Arundhati's mother works in the Hindi series | 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची आई करते 'या' लोकप्रिय हिंदी मालिकेत काम

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीची आई करते 'या' लोकप्रिय हिंदी मालिकेत काम

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठ काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेतील कथा, उत्तम लेखन, दिग्दर्शन आणि यातील कलाकारांच्या अभिनयामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत अरूंधती आणि अनिरुद्धचा घटस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. अरुंधती घर सोडून तिच्या माहेरी गेली आहे. तिथे तिची आई आणि भाऊ व त्याचा मुलगा असतो. अरुंधतीच्या आईची भूमिका निभावणाऱ्या मेधा जांबोटकर हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.


आई कुठे काय करतेमधील अरुंधतीच्या आईची भूमिका मेधा जांबोटकर यांनी साकारली आहे. या मालिकेशिवाय त्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत नायराच्या आजीची भूमिका साकारताना दिसत आहे.

‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘आई कुठे काय करते’ मध्ये अरुंधतीच्या आईची भूमिका कशी मिळाली ते सांगितले. त्यांनी सांगितले की,मी खूप नशीबवान आहे की मला आई कुठे काय करतेमध्ये काम करायची संधी मिळाली. माझी यात पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे आणि मला ही भूमिका खूप गोड वाटली म्हणून मी या मालिकेत काम करण्यासाठी होकार दिला.


मेधा यांनी पुढे म्हटले की,दोन्ही मालिका एकाच प्रोडक्शन हाऊसच्या आहेत त्यामुळे ते माझी काळजी घेतात. मला कधी कधी एका दिवसात दोन सेटवर काम करावे लागते. मात्र मला आनंद आहे की दोन्ही मालिका उत्तम सुरु आहेत.

Web Title: 'Aai Kuthe kay karte' fame Arundhati's mother works in the Hindi series