'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक चर्चेत, फोटो होतोय व्हायरल; एकदा पाहाच हा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:19 IST2022-04-29T17:19:13+5:302022-04-29T17:19:44+5:30
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूकमधील फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक चर्चेत, फोटो होतोय व्हायरल; एकदा पाहाच हा फोटो
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेच्या कथानक आणि पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने ग्लॅमरस लूक चर्चेत आली आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, लक्षात ठेवा: आयुष्याची सुरुवात तुमच्या कम्फर्ट झोनच्या शेवटी होते....हॅप्पी विकेंड डिअर ऑल. मधुराणीच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
आई कुठे काय करते मालिका पुन्हा एक रंजकदार वळणावर आली आहे. संजनासाठी अनिरुद्धने अरुंधतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्याच संजनाला आता तो कंटाळला आहे. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील मैत्री खुलताना दिसते आहे. अनिरुद्धने संजनासोबत केलेले लग्न अभिषेकला मान्य आहे. मात्र, अरुंधतीची आशुतोषसोबत असलेली मैत्री त्याला अजिबात पटलेली नाही. त्यामुळे त्याने यापूर्वीही बऱ्याचदा अरुंधतीचा अपमान केला आहे. मात्र, यावेळी त्याने भर रेस्टॉरंटमध्ये तिचा अपमान केला. ज्यामुळे आशुतोषचा पारा चढतो आणि तो अभिषेकवर हात उचलतो. त्याला तिथून जायला सांगतो. त्यामुळे पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.